Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
लोखंडी गेट अंगावर कोसळून प्लंबरचा मृत्यू

लोखंडी गेट अंगावर कोसळून प्लंबरचा मृत्यू

NEWS डंका 1 month ago

बांधकाम साइटवरील निष्काळजीपणाविरोधात गुन्हा

एलबीएस मार्गालगत सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी लावलेले लोखंडी गेट दुचाकीवरून जात असलेल्या प्लंबरच्या अंगावर कोसळल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली.

या प्रकरणी पार्कसाइट पोलिसांनी साइट सुपरवायझरसह प्रोजेक्ट डायरेक्टर, मॅनेजर आणि संबंधित कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

एफआयआरनुसार, मृत व्यक्तीचे नाव वसी हैदर रिझवी (५४) असून ते प्लंबिंगचे काम करत होते. १८ सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास ते कामासाठी घराबाहेर पडले होते. त्याच दिवशी सकाळी साडेअकराच्या सुमारास ते दुचाकीवरून रोझारी बिल्डिंग, एलबीएस रोड, मुलुंडच्या दिशेने जाणाऱ्या वाहिनीवरील परिसरातून जात असताना बांधकामाच्या ठिकाणी लावण्यात आलेले लोखंडी गेट त्यांच्या अंगावर कोसळले.गंभीर दुखापत झाल्याने त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच दुपारी १२.३५ वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

नुकसानीचा दावा करण्याइतपतही अब्रू शिल्लक नाही काय?

देशाची ऊर्जेची गरज भागविण्यासाठी आम्हाला सर्व पर्याय खुले!

तृणमूल काँग्रेसच्या नाव-चिन्हाचा वाद सर्वोच्च न्यायालयात

पवन सेहरावत होणार भारताचा ध्वजवाहक

कुटुंबीयांना पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळी लोखंडी गेट लावण्यात आले होते. हे गेट योग्य ती खबरदारी आणि सुरक्षेच्या उपाययोजना न करता लावण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. गेट दुचाकीवरून जाणाऱ्या वसी रिझवी यांच्या अंगावर पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा मृत्यू झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या घटनेप्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०६(१) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक पल्लवी अरुण सदांशिव यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
साइटवरील सुरक्षेची जबाबदारी असतानाही आवश्यक खबरदारी न घेतल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप तक्रारदार अली रझा वसी हैदर रिझवी यांनी केला आहे. साइट सुपरवायझरसह प्रोजेक्ट डायरेक्टर, मॅनेजर आणि संबंधित कंपनीच्या विरोधात कायदेशीर कारवाईची मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka