Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
महामेट्रोने म्हटले काँग्रेसचे आरोप महाखोटे !

महामेट्रोने म्हटले काँग्रेसचे आरोप महाखोटे !

राहुल गांधींच्या कार्यक्रमावेळी मेट्रो थांबवल्याचा आरोप

पुण्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या 'छात्रों की गूँज' कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मेट्रो सेवा थांबवल्याच्या आरोपावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे.

काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी 'आरटीओ पुणे' मेट्रो स्थानकावर सेवा थांबवून ठेवण्यात आल्याचा गंभीर आरोप केला. राहुल गांधींच्या कार्यक्रमाला विद्यार्थिनींची मोठी गर्दी होऊ नये, यासाठी प्रशासनाने मेट्रो सेवा रोखल्याचा दावा त्यांनी केला. या आरोपामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित झाले.

साखर महागली, चहादेखील 'उकळणार'

एफएसएसएआयचा दणका! ५० हजारांहून अधिक उत्पादने जप्त, १५० नोटिसा

कॉक्रोच दौडा दौडा भागा भागा सा !

याच पार्श्वभूमीवर प्रशांत जगताप यांनी मेट्रो प्रशासनावर निशाणा साधला. कार्यक्रमस्थळी येणाऱ्या विद्यार्थिनींना मेट्रोच्या माध्यमातून सहज पोहोचता येऊ नये, यासाठी 'आरटीओ पुणे' स्थानकावरील सेवा रोखण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. विरोधी पक्षाच्या कार्यक्रमाला अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचेही त्यांनी म्हटले.

मात्र, महामेट्रोने काँग्रेसचे हे आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले आहेत. पुणे मेट्रोची सेवा बंद करण्यात आली नव्हती, तसेच सेवेत कोणताही खंड पडला नसल्याचे महामेट्रोने स्पष्ट केले. उलट, राहुल गांधी यांच्या कार्यक्रमामुळे आरटीओ स्थानकावर गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरिक्त नियोजन करण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले.

महामेट्रोच्या माहितीनुसार, रामवाडी ते वनाझ मार्गावर दोन अतिरिक्त मेट्रो गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी या गाड्या आरटीओ पुणे स्थानकाजवळील अतिरिक्त मार्गावर ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे मेट्रो सेवा रोखल्याचा आरोप तथ्यहीन असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे .

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka