Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
महाराष्ट्रासह चार राज्यांत विधान परिषद निवडणुकीचा बिगुल

महाराष्ट्रासह चार राज्यांत विधान परिषद निवडणुकीचा बिगुल

NEWS डंका 1 month ago

राज्यातील पाच जागांसाठी मतदान

निवडणूक आयोगाने महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार आणि कर्नाटक या राज्यांमधील विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणुकांची घोषणा केली आहे.

या चार राज्यांतील एकूण २८ जागांसाठी निवडणूक होणार असून, विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ नोव्हेंबर-डिसेंबर २०२६ मध्ये संपत आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित मतदारसंघांमध्ये आचारसंहिता तत्काळ प्रभावाने लागू झाली आहे. एकूण २८ जागांपैकी बिहारमधील आठ, कर्नाटकमधील चार, महाराष्ट्रातील पाच आणि उत्तर प्रदेशातील ११ जागांचा समावेश आहे.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, २९ सप्टेंबर रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी केली जाईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ६ ऑक्टोबर आहे. ७ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होईल, तर ९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान होईल. २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी केली जाईल. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण केली जाणार आहे.

महाराष्ट्रात तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांमध्ये निवडणूक होणार आहे. औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाचे चव्हाण सतीश भानुदासराव, पुणे विभाग पदवीधरचे अरुण गणपती लाड, नागपूर विभाग पदवीधरचे अभिजीत गोविंदराव वंजारी, अमरावती विभाग शिक्षकचे सरनाईक किरण रामराव आणि पुणे विभाग शिक्षकचे जयंत दिनकर आसगावकर यांचा कार्यकाळ ६ डिसेंबर २०२६ रोजी संपणार आहे.

जमुईतील अल्पवयीन मुलीच्या छेडछाड प्रकरणी मुख्य आरोपीला चकमकीनंतर अटक

पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ पतंग उडवणाऱ्या मुलीच्या घरावर एटीएसचा छापा

पोलीस असल्याचे भासवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला घातली गोळी

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ हे भारतीय राज्यांच्या विधान परिषदेतील सदस्य अर्थात एमएलसी निवडण्यासाठी असलेले विशेष मतदारसंघ आहेत. या मतदारसंघांमध्ये सर्वसामान्य नागरिकांऐवजी पात्र पदवीधर आणि शिक्षक मतदान करतात.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka