आंदोलनात बॅनरवर होता फोटो
दिल्लीतील जंतर-मंतरवर झालेल्या 'कॉकरोच जनता पार्टी' (सीजेपी)च्या आंदोलनादरम्यान महिलेचा मॉर्फ केलेला फोटो आक्षेपार्ह पद्धतीने वापरल्याच्या आरोपावरून चौघांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
सौरव दास, अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि रत्ना सिंह यांची या प्रकरणात नावे असल्याचे समोर आले आहे.
माहितीनुसार, संबंधित महिलेचा फोटो डिजिटल पद्धतीने मॉर्फ करून त्यात फेरफार करण्यात आला. हा फोटो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्रासोबत आक्षेपार्ह आणि लैंगिक सूचक स्वरूपात तयार करून आंदोलनादरम्यान बॅनर आणि पोस्टर्सवर प्रदर्शित करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तक्रारदार महिलेने आपण सीजेपी, या आंदोलनाशी किंवा बॅनरवर प्रदर्शित करण्यात आलेल्या संबंधित मजकुराशी कोणत्याही प्रकारे संबंधित नसल्याचे म्हटले आहे. तिच्या परवानगीशिवाय छायाचित्राचा वापर करण्यात आला आणि त्यामध्ये फेरफार करून सार्वजनिकरित्या आपली बदनामी व अपमान करण्यात आल्याचा आरोप तिने केला आहे.
तक्रारीनुसार, हे बॅनर जंतर-मंतरवरील आंदोलनात गर्दीसमोर दाखवण्यात आले. यावेळी संबंधित महिलेविरोधात आक्षेपार्ह घोषणा आणि अश्लील स्वरूपाच्या टिप्पणी करण्यात आल्याचाही आरोप आहे. या संपूर्ण प्रकाराचे व्हिडीओ रेकॉर्ड करून ते सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. सौरव दास, अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि रत्ना सिंह यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी महिलेची छायाचित्रे अनधिकृतपणे मिळवून त्यांचा वापर केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी तक्रारदार महिलेने केली आहे.
ट्रम्प-शी जिनपिंग भेटीत व्यापार, तैवान, एआयवर चर्चा
पश्चिम बंगालमधील २५० मदरशांवर लागणार टाळे
'धुरंधर'ने बदलला लडाखच्या पर्यटनाचा चेहरा
या प्रकरणात माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० आणि भारतीय न्याय संहितेतील (BNS) संबंधित तरतुदींनुसार कारवाईचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, नेमकी कलमे आणि प्रकरणातील आरोपांचा तपशील पोलिसांच्या तपासानंतर स्पष्ट होणार आहे. सीजेपीच्या जंतर-मंतर आंदोलनात हे चौघेही प्रमुख भूमिकेत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. सौरव दास आणि आशुतोष रांका हे सीजेपीचे प्रवक्ते, तर अभिजित दिपके हे संस्थापक आणि रत्ना सिंह या मुख्य टीमचा भाग असल्याचे सांगण्यात आले आहे.

