Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'मोदीजी. तुम्ही आमच्या मुलीला नवे जीवन दिलेत!'

'मोदीजी. तुम्ही आमच्या मुलीला नवे जीवन दिलेत!'

NEWS डंका 3 weeks ago

मोदींबद्दल अपशब्द उच्चारणाऱ्या तरुणीच्या आईने मानले आभार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंदोलनादरम्यान त्यांच्याविरोधात आक्षेपार्ह घोषणा देणाऱ्या तरुणीला माफ करण्याचे आवाहन केल्यानंतर तिच्या आईने मोदींचे आभार मानले आहेत.

मोदींच्या निर्णयामुळे आपल्या मुलीला 'नवे जीवन' मिळाले असल्याचे तिच्या आईने म्हटले आहे.

'पीटीआय'शी बोलताना तरुणीच्या आईने हात जोडून पंतप्रधान मोदींबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. 'पंतप्रधान मोदींनी मोठेपणा दाखवत अश्लील आणि आक्षेपार्ह शब्द वापरणाऱ्या मुलीला माफ केले. आज तिचा वाढदिवस आहे आणि मोदींनी तिला सर्वात मोठी भेट दिली आहे—जीवदान. आज माझी मुलगी पुन्हा जन्माला आली आहे,' असे तिच्या आईने सांगितले.

मोदींचे संयमाचे आवाहन

दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या दिवंगत आईविरोधात आक्षेपार्ह घोषणा दिल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर मोदींनी शुक्रवारी समाजमाध्यमावर व्हिडिओ संदेश प्रसिद्ध करत संयमाचे आवाहन केले. आक्षेपार्ह घोषणा करणाऱ्यांना 'भरकटलेले' म्हणत मोदींनी राग किंवा सूड घेणे हा मार्ग नसल्याचे सांगितले.

यानंतर संबंधित मुलीचा माफी मागतानाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला. या व्हिडिओमध्ये तिने स्वतःचे वय १५ वर्षे असल्याचे सांगितले आणि आंदोलनादरम्यान झालेल्या प्रकाराबद्दल देशाची माफी मागितली.

पंतप्रधान मोदी 'अपयशी'; १२ वर्षात हुकूमशहा बनले नाहीत!

पोलिसांविरुद्धचे हे षडयंत्रच !

झुरळांना पंख फुटले ; पाय आभाळाला लागले!

मोदींच्या प्रत्येक राष्ट्रीय सुरक्षा निर्णयामागे डोवालांचा सल्ला!

'माझ्याकडून पहिली आणि शेवटची चूक'

व्हिडिओमध्ये मुलीने सांगितले की, ती मैत्रिणींसोबत कनॉट प्लेसला गेल्यानंतर जंतर-मंतरवरील आंदोलनात पोहोचली होती. तेथे आजूबाजूच्या लोकांकडून पंतप्रधानांविरोधात आक्षेपार्ह घोषणा दिल्या जात होत्या. त्यांच्या प्रभावाखाली आपणही आक्षेपार्ह शब्द वापरल्याचे तिने म्हटले. 'मी जे केले ते माफीच्या लायकीचे नव्हते. मी अनेक वाईट गोष्टी बोलले. ही माझी पहिली आणि शेवटची चूक आहे. मला खूप लाज वाटत आहे. कृपया मला माफ करा,' असे तिने म्हटले.

माफी मागितल्यानंतरही गुन्हा

या प्रकरणात माफी मागण्यापूर्वीच नोएडा पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. २३ जुलै रोजी जंतर-मंतर येथे पंतप्रधानांविरोधात कथित आक्षेपार्ह घोषणा दिल्याप्रकरणी शून्य एफआयआर दाखल करण्यात आला होता.

यानंतर नवी दिल्लीतील संसद मार्ग पोलिस ठाण्याकडे सदर तक्रार वर्ग करण्यात आली. तक्रारदाराने पंतप्रधानपदाच्या घटनात्मक पदाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवण्याचा तसेच समाजात तेढ आणि सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता निर्माण केल्याचा आरोप केला आहे.

आईची एफआयआर मागे घेण्याची मागणी

मुलीच्या आईने सांगितले की, आपण आणि आपल्या मुलीने वारंवार माफी मागितली आहे. त्यामुळे तिच्याविरोधातील एफआयआर मागे घेण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. आईने असा दावाही केला की, एफआयआरमध्ये मुलीचे वय चुकून २५ वर्षे नमूद करण्यात आले असून ती प्रत्यक्षात १५ वर्षांची अल्पवयीन आहे.

'आई म्हणाली, मुलांना आंदोलनांपासून दूर ठेवा'

मुलीच्या आईने सरकारकडे सोशल मीडियाच्या वापराबाबतही कठोर मागणी केली. २० वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम आणि फेसबुक वापरण्यास प्रतिबंध करावा, तसेच अल्पवयीन मुलांना आंदोलनांमध्ये सहभागी होऊ देऊ नये, असे आवाहन त्यांनी पंतप्रधान मोदींना केले. 'मुलांनी केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. काही लोक मुलांचा वापर करून त्यांच्याकडून काहीही बोलून घेतात,' असा दावा त्यांनी केला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka