Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पंतप्रधान मोदी 'अपयशी'; १२ वर्षात हुकूमशहा बनले नाहीत!

पंतप्रधान मोदी 'अपयशी'; १२ वर्षात हुकूमशहा बनले नाहीत!

NEWS डंका 3 weeks ago

शेहजाद पूनावाला यांची पोस्ट

भाजप नेते शेहजाद पूनावाला यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात एक पोस्ट केली ज्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. ते म्हणाले, मोदी हे 'हुकूमशहा बनण्यात अपयशी ठरले'.

नुकत्याच झालेल्या NEET आंदोलनाच्या वादावर पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या व्हीडिओची तुलना करताना त्यांनी सदर विधान केले.

विशेष म्हणजे, याच्या एक दिवस आधी पूनावाला यांनी त्यांच्या एक्स अकाउंटमध्ये बदल करून बायोमधून 'भाजप राष्ट्रीय प्रवक्ते' हा उल्लेख काढून टाकला होता.

एका वर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये पूनावाला म्हणाले की, ते पंतप्रधान मोदींबाबत 'पूर्णपणे निराश' आहेत. हा त्यांनी काँग्रेस नेत्यांना मारलेला टोला होता. उपरोधिकपणे ते म्हणाले, 'बारा वर्षे झाली पण त्यांना एक हुकूमशहा कसे बनायचे, हेही माहीत नाही.'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'नीट' आंदोलनादरम्यान दिल्लीतील जंतर-मंतर येथे कथितरित्या त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या दिवंगत आईबद्दल अपशब्द वापरणाऱ्या विद्यार्थ्यांना माफ करण्याचे आवाहन केल्याच्या एका दिवसानंतर पूनावाला यांनी ही टिप्पणी केली.

जहाजबांधणीचा प्रयोग नवा; भारताच्या शिडात प्रगतीची हवा

होर्मुझमधून तेलपुरवठ्याला पुन्हा वेग

अभिजीत दिपकेचा शिक्षणाचा खर्च कुणी केला ?

पोलिसांविरुद्धचे हे षडयंत्रच !

मोदी यांनी हुकूमशहाप्रमाणे वागण्याऐवजी समाजाला, पोलिसांना आणि इतर सर्वांना विद्यार्थ्यांना माफ करण्याचे आवाहन केले, असे पूनावाला म्हणाले.

'काल रात्री त्यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला. घटनात्मक पदांवरील व्यक्तींबद्दल आणि त्यांच्या दिवंगत आईबद्दल अपशब्द वापरणाऱ्या मुलांबाबत त्यांनी म्हटले की, 'ही खोडकर मुले आहेत, त्यांना माफ करा.' त्यांनी समाजाला, पोलिसांना आणि सर्वांनाच त्यांना माफ करण्याचे आवाहन केले,' असे पूनावाला म्हणाले.

त्यानंतर पुनावाला यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, 'राहुल गांधी हे इंदिरा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांचे वंशज आहेत. खरा हुकूमशाही कारभार काय असतो, खरी आणीबाणी काय असते, हे मोदीजी, त्यांच्याकडून शिका.'

मोदी सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेतले, असा दावा करताना पूनावाला यांनी काँग्रेसच्या सरकारांवर सोशल मीडिया पोस्ट आणि आंदोलनांबद्दल गुन्हे दाखल केल्याचा आरोप केला.

केरळमधील अलीकडील घटनांचा उल्लेख करताना त्यांनी राहुल गांधी यांचा कथित अपमान केल्याप्रकरणी इंस्टा वापरकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आल्याचा दावा केला. तसेच कर्नाटकमध्ये एका पोस्टरप्रकरणी आणि एका रॅपरविरोधात पोलिसांनी कारवाई केल्याचाही त्यांनी उल्लेख केला.

पूनावाला यांनी काँग्रेसच्या राजकीय इतिहासाचाही संदर्भ दिला. जवाहरलाल नेहरू यांनी अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर मर्यादा आणल्याचा आणि इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू करून विरोधी पक्षांच्या नेत्यांना तुरुंगात टाकल्याचा व असहमती दडपल्याचा आरोप त्यांनी केला.

आसाम आंदोलन, नवनिर्माण आंदोलन आणि अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखालील भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचाही त्यांनी उल्लेख केला. त्या काळात हजारो आंदोलनकर्त्यांना तुरुंगात डांबण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

पंतप्रधान मोदींना उद्देशून पूनावाला पुन्हा म्हणाले, 'आज मुले अपशब्द वापरत आहेत आणि तुम्ही म्हणत आहात की, 'ही मुले आहेत, चुका होतात. आपण त्यांना योग्य मार्गावर आणण्यास मदत केली पाहिजे.' पण राहुलजी एखाद्या खऱ्या हुकूमशहाप्रमाणे गुन्हे दाखल करून घेत आहेत.'

आपल्या वक्तव्याच्या शेवटी त्यांनी पंतप्रधान मोदींच्या टीकाकारांना उद्देशून पुन्हा उपरोधिक टोला लगावला.

'मोदीजी, बारा वर्षे झाली. तुम्हाला हुकूमशहा बनता आलेले नाही. तुम्ही या सर्व डाव्या विचारसरणीच्या उदारमतवाद्यांच्या आशा धुळीस मिळवल्या आहेत. तुम्ही अपयशी ठरलात,' असे पूनावाला म्हणाले.

विद्यार्थ्यांना माफ करण्याचे पंतप्रधान मोदींचे आवाहन

शुक्रवारी रात्री उशिरा प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'नीट' आंदोलनादरम्यान त्यांच्या दिवंगत आईबद्दलही 'अत्यंत गलिच्छ अपशब्द' वापरले गेल्याचे सांगत दुःख व्यक्त केले. मात्र, त्यांनी समाजाला विद्यार्थ्यांना शिक्षा न करण्याचे आवाहन केले.

मोदी यांनी या विद्यार्थ्यांना 'भरकटलेली मुले' संबोधत त्यांना माफ करण्याचे आणि त्यांना त्यांच्या चुका समजून घेण्यास मदत करण्याचे आवाहन केले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka