Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मोदींचा टोला.लाल किल्ल्यावरून दिली 'दिमागी नक्षल'ची होमिओपॅथिक गोळी

मोदींचा टोला.लाल किल्ल्यावरून दिली 'दिमागी नक्षल'ची होमिओपॅथिक गोळी

NEWS डंका 1 month ago

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दिल्लीतील श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्सच्या शताब्दी सोहळ्यात विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. आपल्या भाषणात मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणातील 'दिमागी नक्षल' या शब्दप्रयोगाचा पुन्हा उल्लेख करत विरोधकांवर मिश्कील टीका केली.

यावेळी मोदी यांनी 'दिमागी नक्षल' या शब्दप्रयोगाची तुलना चक्क होमिओपॅथिक गोळीशी केली.

मोदी म्हणाले, 'तुम्ही माझे लाल किल्ल्यावरील भाषण ऐकले असेल. लाल किल्ल्यावरून मी एक होमिओपॅथिक गोळी दिली होती—'दिमागी नक्षल'. होमिओपॅथीच्या तत्त्वानुसार उपचार सुरू केल्यानंतर सुरुवातीला आजार वाढल्यासारखा वाटतो. होमिओपॅथीचे हेच स्वरूप आहे.'

पुढे ते म्हणाले, 'त्याचप्रमाणे मी 'दिमागी नक्षल' ही होमिओपॅथिक गोळी दिल्यानंतर एकापाठोपाठ एक 'दिमागी नक्षल' बाहेर येऊ लागले. आता हा आजार पसरवणाऱ्यांचे खरे रंगही जनता पाहत आहे.'

श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना मोदी यांनी तरुण पिढीसमोर विकसित भारताचे महत्त्वाकांक्षी ध्येय मांडले. देशाने गेल्या काही वर्षांत अनेक मोठ्या संकटांचा सामना केला असून, या संकटांमधून भारत कसा पुढे आला, याचा विचार तरुणांनी करावा, असे आवाहन त्यांनी केले.

मोदी म्हणाले, 'मी तुम्हाला अनेक गोष्टी सांगितल्या. काही जण विचार करू शकतात की, १४० कोटी लोकसंख्येचा हा देश आहे, हे सर्व खूप सोपे होते. मोदींनी नवीन काय केले? पण हे खरोखर इतके सोपे होते का? चला, पुन्हा एकदा तुम्हाला जुन्या काळात घेऊन जातो.'

मागील सरकारच्या संकट हाताळण्याच्या पद्धतीवर टीका करताना मोदी यांनी २०१३ मधील केदारनाथ दुर्घटनेचा उल्लेख केला. ते म्हणाले, 'तुम्ही शाळेत होता, तेव्हा २०१३ मध्ये केदारनाथमध्ये आपत्ती आली होती. संपूर्ण सरकार हादरले होते. काय करावे आणि त्याला कसा प्रतिसाद द्यावा, हेच त्यांना समजत नव्हते.'

'हनुमान अंश'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

संयुक्त राष्ट्रांच्या नकाशात लडाख, जम्मू-काश्मीरबाबत तडजोड नाही!

पंजाबमध्ये स्वाईन फ्लूमुळे एका संशयिताचा मृत्यू

मध्य प्रदेशच्या सागरमध्ये विषारी दारूमुळे ११ जणांचा मृत्यू

मोदी यांनी २००८च्या जागतिक आर्थिक संकटाच्या काळातील तत्कालीन सरकारच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले. '२००८ मध्ये बँकिंग संकट आले, तेव्हा तत्कालीन सरकारने अनेक वर्षे त्या संकटामागे लपण्याचा प्रयत्न केला. त्याला सामोरे जाण्याचे धैर्यही त्यांनी दाखवले नाही. भारताची संपूर्ण बँकिंग व्यवस्था कोसळण्याच्या उंबरठ्यावर पोहोचली होती,' असा दावा मोदी यांनी केला.

आपल्या सरकारसमोर आलेल्या विविध आव्हानांचा उल्लेख करताना मोदी यांनी कोरोना महामारी, रशिया-युक्रेन युद्ध, व्यापार आणि पुरवठा साखळीवरील परिणाम तसेच पश्चिम आशियातील संकटाचा उल्लेख केला. ते म्हणाले की, प्रत्येक संकटाच्या वेळी काही लोकांनी 'आता भारत टिकणार नाही' असे म्हटले. मोदींना अडचणीत सापडल्याचे पाहून काही जण आनंदीही झाले. मात्र, भारतीय जनतेच्या आशीर्वादाची ताकद इतकी मोठी आहे की भारत अपयशी व्हावा अशी इच्छा बाळगणाऱ्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या नाहीत, असा दावा त्यांनी केला.

खर्गेंची मोदींवर टीका

दरम्यान, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी समाजमाध्यमांवरील पोस्टद्वारे पंतप्रधान मोदींवर टीका केली. तरुण आणि देशाशी संबंधित प्रश्नांवर संवाद साधण्यासाठी मिळालेल्या व्यासपीठाचा वापर मोदी यांनी 'पुन्हा एकदा राजकीय प्रचारासाठी' केल्याचा आरोप खर्गे यांनी केला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka