Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मोहम्मद अजहरुद्दीन टीम इंडियात पदार्पण करणार?

मोहम्मद अजहरुद्दीन टीम इंडियात पदार्पण करणार?

NEWS डंका 3 months ago

मोहम्मद अजहरुद्दीन हे नाव ऐकलं की भारतीय क्रिकेटचा माजी कर्णधार आठवतो. पण ही गोष्ट आहे दुसऱ्या अजहरुद्दीनची… जो अजूनही टीम इंडियाच्या पदार्पणासाठी झगडतोय.

केरळमधील थलंगारा येथे २२ मार्च १९९४ रोजी जन्मलेल्या या खेळाडूचं नाव त्याच्या कुटुंबाने त्यांच्या आवडत्या क्रिकेटरवरून ठेवलं.

नावाचा प्रभाव इतका होता की त्यानेही क्रिकेटलाच आपलं करिअर बनवलं.

३१ वर्षीय अजहरुद्दीन हा केरळकडून घरेलू क्रिकेट खेळतो. उजव्या हाताचा फलंदाज आणि विकेटकीपर अशी त्याची ओळख आहे.

२०१५ साली, अवघ्या २१ व्या वर्षी त्याने गोव्याकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्याच वर्षी लिस्ट ए मध्ये, तर २०१६ मध्ये टी२० क्रिकेटमध्ये त्याने एन्ट्री घेतली.

गेल्या दशकभरात त्याने सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. प्रथम श्रेणीतील ४३ सामन्यांत २ शतके आणि ११ अर्धशतकांसह १,९३२ धावा त्याच्या नावावर आहेत. त्याचा सर्वोच्च स्कोअर नाबाद १७७ आहे.

लिस्ट ए क्रिकेटमध्ये १ शतक आणि ८ अर्धशतकांसह १,१६३ धावा त्याने केल्या आहेत. तर टी२० मध्ये १२९.६८ च्या स्ट्राइक रेटने ८७८ धावा करत १ शतक झळकावलं आहे. या फॉरमॅटमध्ये त्याचा सर्वोच्च स्कोअर नाबाद १३७ आहे.

विकेटकीपर म्हणूनही त्याने आपली छाप सोडली आहे. प्रथम श्रेणीत १०९ कॅच आणि १६ स्टंपिंग, लिस्ट ए मध्ये ४२ कॅच आणि ६ स्टंपिंग, तर टी२० मध्ये २९ कॅच आणि १ स्टंपिंग त्याच्या नावावर आहेत.

हेही वाचा:

इराणच्या नतांज अणु केंद्रावर हल्ला!

गौरक्षक 'फरसा वाले बाबां'च्या मृत्यूनंतर दिल्ली-आग्रा महामार्ग जाम

इराणकडून होर्मुज सामुद्रधुनी बंद; २० देशांची नाराजी

मिराज-2000 लढाऊ विमाने २०३८-३९ पर्यंत देणार सेवा

मात्र, टीम इंडियात विकेटकीपर फलंदाजांच्या जागेसाठी प्रचंड स्पर्धा आहे. संजू सॅमसन, ईशान किशन, केएल राहुल, जितेश शर्मा, ऋषभ पंत आणि ध्रुव जुरेल यांसारखे खेळाडू आधीच रांगेत असल्याने अजहरुद्दीनसाठी संधी मिळवणं कठीण ठरतंय.

नाव मोठं… स्वप्न त्याहून मोठं… पण अजूनही टीम इंडियाचं दार उघडण्याची वाट पाहणारा हा अजहरुद्दीन संघर्ष सुरूच ठेवून आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka