Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मुलीचे कपडे फाडल्याचा व्हीडिओ बनावट.तो होता मुलगा

मुलीचे कपडे फाडल्याचा व्हीडिओ बनावट.तो होता मुलगा

काँग्रेस, कॉक्रोच पार्टीच्या समर्थकांनी, नेत्यांनी शेअर केला व्हीडिओ

दिल्लीमध्ये १० ऑक्टोबर रोजी झालेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या (सीजेपी) आंदोलनादरम्यान कथित मारहाणीच्या एका व्हिडिओवरून सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला आहे.

या व्हिडिओच्या आधारे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी दिल्ली पोलिसांच्या उपस्थितीत एका मुलीला मारहाण केल्याचा दावा करण्यात आला. काँग्रेस, सीजेपीशी संबंधित समाजमाध्यम खात्यांनी तसेच काही प्रभावकांनी हे दावे प्रसारित केल्याचे वृत्त आहे. मात्र घटनेचे वास्तव नंतर समोर आले.

सीजेपीच्या अधिकृत समाजमाध्यम खात्यावरून, 'अत्यंत चिंताजनक! दिल्ली पोलिसांच्या उपस्थितीत भाजप-आरएसएसचे गुंड एका तरुणीला मारहाण करत आहेत. एक पोलीस अधिकारी चित्रीकरण थांबवण्यास सांगत असल्याचेही दिसत आहे. शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांचे संरक्षण करण्याऐवजी दिल्ली पोलीस हल्लेखोरांना मदत का करत आहेत?' अशा आशयाची पोस्ट करण्यात आली.

काँग्रेसच्या अधिकृत खात्यावरूनही या घटनेवर प्रतिक्रिया देण्यात आली. 'दिल्ली पोलिसांसमोर भाजप-आरएसएसचे गुंड आंदोलकांना मारहाण करत आहेत. मोदी-शाह यांनी संपूर्ण देशात गुंडगिरीचे राज्य प्रस्थापित केले आहे,' असा आरोप काँग्रेसने केला. व्हिडिओमध्ये एका मुलीला खाली पाडून मारहाण केली जात असताना पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा दावाही करण्यात आला.

ओपइंडियाच्या वृत्तानुसार, या घटनेचा आणखी एक व्हिडिओ डॉ. प्रकाश सिंह यांनी समाजमाध्यमांवर प्रसारित केला. या व्हिडिओमध्ये दोन ते तीन पुरुष एका कारमधून जात असताना सीजेपीच्या आंदोलकांनी त्यांची गाडी घेरल्याचे आणि गाडीच्या काचांवर लाथा मारल्याचे दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

या वृत्तानुसार, कारच्या मागील बाजूस 'जय श्रीराम'चा संदेश असलेले स्टिकर पाहिल्यानंतर आंदोलकांनी संबंधित पुरुषांना लक्ष्य केले. त्यांना शिवीगाळ करण्यात आली, हातवारे करून चिथावणी देण्यात आली आणि त्यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला.

कल्याण-टिटवाळा परिसरात अपहरणाच्या घटनांनी खळबळ

एलॉन मस्क यांचा मुकेश अंबानींवर पुन्हा निशाणा

सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लखनऊमध्ये हाय अलर्ट

कॉक्रोचच्या आंदोलनाला१३ कोटींपैकी किती येतील? १ कोटी, १ लाख की १० हजार |

डॉ. प्रकाश सिंह यांनी प्रसारित केलेल्या व्हिडिओच्या आधारे, पहिल्या व्हिडिओतील काळा टी-शर्ट घातलेली व्यक्ती मुलगी नसून मुलगा असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तीला मुलगी संबोधून भाजप-आरएसएसच्या कार्यकर्त्यांनी तिचे कपडे फाडल्याचा जो दावा केला जात आहे, त्याच्या सत्यतेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka