Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मुंबई उच्च न्यायालयाचा 'ओल्ड मॉन्क'च्या लेबलवर आक्षेप

मुंबई उच्च न्यायालयाचा 'ओल्ड मॉन्क'च्या लेबलवर आक्षेप

NEWS डंका 1 month ago

महाराष्ट्रातील विक्रीबंदी कायम

महाराष्ट्रात लोकप्रिय असलेल्या 'ओल्ड मॉन्क' रमच्या विक्रीवरून निर्माण झालेला वाद आता मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) 'ओल्ड मॉन्क'च्या काही प्रकारांच्या विक्रीवर आक्षेप घेतला आहे.

बाटलीवर '७ इयर्स ओल्ड ब्लेंडेड' आणि 'व्हेरी ओल्ड व्हॅटेड' असे उल्लेख असल्याने ग्राहकांची दिशाभूल होण्याची शक्यता असल्याचे प्राधिकरणाचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे उत्पादनात 'अॅडेड फ्लेवर'चा वापर करण्यात आला असल्याची माहिती लेबलवर अत्यंत लहान अक्षरात देण्यात आल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनास आले.

एफएसएसएआयच्या म्हणण्यानुसार, संबंधित उत्पादनात मोठ्या प्रमाणात न मुरवलेले न्यूट्रल स्पिरिट असून, प्रत्यक्ष मुरवलेल्या रमचे प्रमाण पाच टक्क्यांपेक्षाही कमी आहे. तसेच चव आणि सुगंधासाठी फ्लेवरिंगचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे अशा उत्पादनाला केवळ 'रम' म्हणून विकण्याऐवजी 'रम फ्लेवर्ड स्पिरिट' असा उल्लेख करणे आवश्यक असल्याचा दावा प्राधिकरणाने केला आहे. दुसरीकडे, कंपनीने फ्लेवरिंगच्या वापराला नियमांनुसार परवानगी असल्याचे सांगत आपली बाजू मांडली आहे.

जंतर मंतर हल्लाप्रकरणी स्वतंत्र भारद्वाजला एक दिवसाची कोठडी

'इक्वल अर्थ' नकाशाला १६४ देशांचा पाठिंबा

२७ नोव्हेंबर 'बालविवाह विरोधी दिवस' म्हणून घोषित!

दरम्यान, कंपनीने बाटलीच्या लेबलमध्ये बदल करण्याची तयारी दर्शवली आहे. '७ इयर्स ओल्ड ब्लेंडेड' हा उल्लेख हटवण्यासोबतच 'अॅडेड फ्लेवर'ची माहिती अधिक स्पष्टपणे देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने सध्या विक्रीबंदीला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. सुधारित लेबलची तपासणी एफएसएसएआय आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून केली जाणार असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी ११ सप्टेंबरला होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील 'ओल्ड मॉन्क'च्या चाहत्यांचे लक्ष आता न्यायालयाच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka