मुंबईकरांना महागाईचा पुन्हा झटका
मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांच्या दैनंदिन खर्चात पुन्हा वाढ झाली आहे. महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) १ सप्टेंबरपासून सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ केली आहे.
सीएनजीच्या दरात प्रतिकिलो २ रुपयांची, तर घरगुती पाइप्ड नॅचरल गॅस अर्थात पीएनजीच्या दरात प्रति एससीएम १ रुपयाची वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीनंतर मुंबई आणि परिसरात सीएनजीचा दर ८८ रुपये प्रतिकिलो, तर पीएनजीचा दर ५३ रुपये प्रति एससीएम झाला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील नैसर्गिक वायूच्या किमतीत झालेली वाढ आणि पश्चिम आशियातील अस्थिर परिस्थितीचा परिणाम गॅसच्या किमतीवर झाला आहे. सीएनजीची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आयातीत एलएनजीचा वापर करावा लागत असून त्याचा खर्च वाढला आहे. त्यामुळे वाढलेल्या इनपुट खर्चाचा काही भार ग्राहकांवर टाकण्याचा निर्णय एमजीएलने घेतला आहे.
सुभाष चंद्रांना मोठा झटका; एनसीएलटीकडून दिवाळखोरी आदेशाला स्थगिती
जागतिक संकटातही भारतीय अर्थव्यवस्थेची भरारी; जीडीपी वाढीचा दर ७.८ टक्के
सीएनजीच्या दरवाढीचा थेट परिणाम रिक्षा, टॅक्सी, खासगी वाहनधारक तसेच व्यावसायिक वाहनचालकांवर होणार आहे. इंधनाचा खर्च वाढल्याने प्रवासाचा खर्चही वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, पीएनजी महागल्याने घरगुती गॅस वापरणाऱ्या लाखो कुटुंबांच्या मासिक बजेटवर अतिरिक्त भार पडणार आहे. आधीच महागाईमुळे वाढलेल्या दैनंदिन खर्चात आता गॅसच्या दरवाढीची भर पडल्याने सर्वसामान्य मुंबईकरांचे आर्थिक गणित पुन्हा बिघडण्याची शक्यता आहे.

