Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मुंबईतील १६४ पैकी १५२ शाळांतून लँड जिहाद

मुंबईतील १६४ पैकी १५२ शाळांतून लँड जिहाद

NEWS डंका 1 month ago

भाजपा नेते किरीट सोमय्यांचा आरोप

भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी 'स्कूल जिहाद'चा उल्लेख करत गंभीर आरोप केले आहेत की शहरात १६४ शाळा पूर्णपणे बेकायदेशीरपणे चालू आहेत. त्यांच्या मते, यापैकी १५२ शाळा मुस्लिमबहुल भागांमध्ये आहेत.

मुलांच्या नावाखाली हे लोक 'लँड जिहाद' करत आहेत. त्यांनी असेही आरोप केले की यामागे आंतरराष्ट्रीय कट असू शकतो. जमीन माफिया सरकारी जमीन बळकावत आहेत आणि मुलांच्या भविष्याशी खेळ करत आहेत.

किरिट सोमय्या यांनी दावा करत म्हटले, 'आम्ही स्वतः या शाळांना भेट दिली आणि व्हिडिओ प्रसिद्ध करून दाखवले की अनेक ठिकाणी शाळेच्या नावाखाली इमारत बांधली जाते आणि नंतर तिथे मशिद उभारली जाते. काही ठिकाणी मंदिराची जागा बळकावून अशा प्रकारे शाळा उभारण्यात आल्या आणि त्याच्या नावाखाली 'स्कूल जिहाद' केला गेला.'

तात्काळ कारवाईची मागणी

किरिट सोमय्या यांनी महानगरपालिका प्रशासनाकडे मागणी केली की या बेकायदेशीर शाळा तात्काळ बंद करण्यात याव्यात आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. त्यांनी सांगितले, 'आता बीएमसीमध्ये भाजपची सत्ता आल्यामुळे तातडीने कारवाई होईल. यादी समोर आल्यानंतर बीएमसी महापौरांनीही त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. जर कारवाई झाली नाही, तर मी स्वतः बीएमसी कार्यालयासमोर उभा राहीन.'

६५ जागा ठरवणार पश्चिम बंगालचे भवितव्य

एनजीओच्या आडून धर्मांतर, लैंगिक शोषणाचा प्रकार; रियाज काजी अटकेत

घरून काम, फक्त सहा आठवड्यांचे जेट इंधन शिल्लक

कोणत्या भागांतील शाळांना भेट दिली?

ते पुढे म्हणाले, 'या शाळांपैकी १४५ इंग्रजी माध्यमाच्या, ४ हिंदी माध्यमाच्या, ४ मराठी माध्यमाच्या आणि ११ उर्दू माध्यमाच्या आहेत. या सर्व शाळांना मुस्लिम जमीन माफियांनी जमीन बळकावण्यासाठी शाळेचे नाव दिले आहे.'

किरिट सोमय्या यांच्या मते, त्यांनी ज्या शाळांना भेट दिली त्या मानखुर्द, गोवंडी, कुर्ला आणि मालवणी या भागांमध्ये आहेत, जे मुस्लिमबहुल क्षेत्र आहेत.

भाजप नेते सोमय्या म्हणाले, 'मुलांच्या नावाने हे लोक लँड जिहाद करत आहेत. या शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांना जवळच्या शाळांमध्ये हलवले जाईल.'

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka