Dailyhunt
मुंब्रा येथे कन्स्ट्रक्शन व्यावसायिकाच्या घराबाहेर गोळीबार

मुंब्रा येथे कन्स्ट्रक्शन व्यावसायिकाच्या घराबाहेर गोळीबार

NEWS डंका 1 month ago

पाठलागात आरोपी ताब्यात, दोघे जखमी

मुंब्रा येथील कौसा परिसरात कन्स्ट्रक्शन व्यावसायिक आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर नदीम मोइनुद्दीन खान उर्फ बाबा खान यांच्या घराबाहेर अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार केल्याची घटना शनिवारी पहाटे उघडकीस आली.

या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. मात्र ताब्यात घेताना आरोपीने पुन्हा गोळीबार केल्याने दोन नागरिक जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे सुमारे ४.५४ वाजण्याच्या सुमारास कौसा येथील अरमान को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीमध्ये गोळीबार झाल्याचा कॉल पोलिसांना प्राप्त झाला. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सावंत यांचे तपास पथक आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक सोनवणे घटनास्थळी दाखल झाले.

प्राथमिक तपासात नदीम खान यांच्या घराबाहेर उभी असलेल्या एमएच ०३ सीएन ५९०० या कारवर दोन गोळ्या झाडण्यात आल्याचे, तसेच हवेत एक गोळी झाडण्यात आल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा पाठलाग सुरू केला. शिळ-डायघर पोलिस ठाण्याच्या हद्दीत आचार गल्ली येथे पोलिसांनी संशयिताला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने पोलिसांवर आणि परिसरात पाच गोळ्या झाडल्या. या गोळीबारात तेथे उपस्थित असलेले दोन नागरिक जखमी झाले. त्यांना तातडीने कळसेकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

ट्रम्प, बायडेन यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी पाकिस्तानी नागरिक दोषी!

IRINS देना बुडण्यापूर्वी भारताने दुसऱ्या इराणी जहाजाला दिलेला आश्रय

राज्याच्या अर्थसंकल्पात मुंबईसाठी काय?

'लाडकी बहिण योजना' सुरूच राहणार!

नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन पोलिसांनी प्रतिउत्तरादाखल गोळीबार केला नाही. मात्र धाडसी कारवाई करत आरोपीला शस्त्रासह ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून चार रिकामे मॅगझिन जप्त करण्यात आले आहेत. चौकशीत आरोपीचे नाव शहाबद उर्फ शंभू मुन्ना शमशाद कुरेशी (वय २८, रा. मुंब्रा) असे समोर आले आहे. या गुन्ह्यात त्याचा आणखी एक साथीदार असल्याची माहिती मिळाली असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. घटनेनंतर नदीम खान यांच्या घराजवळ पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिसरात सध्या शांतता असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka