Dailyhunt
निदर्शनांनंतर पाकिस्तानमधील अमेरिकन दूतावासातील व्हिसा प्रक्रिया स्थगित

निदर्शनांनंतर पाकिस्तानमधील अमेरिकन दूतावासातील व्हिसा प्रक्रिया स्थगित

NEWS डंका 2 months ago

अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूचे पडसाद पाकिस्तानात

राणचे सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूचे पडसाद पाकिस्तानातही उमटले. यानंतर पाकिस्तानमधील अमेरिकन दूतावासातील व्हिसा प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

रविवार, १ मार्च रोजी कराचीमधील अमेरिकेच्या वाणिज्य कचेरीच्या प्रवेशद्वारावर निदर्शकांनी धडक देण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांना रोखताना पोलिसांशी झालेल्या चकमकीत १० जणांचा मृत्यू झाला.

इस्रायल आणि अमेरिकेच्या कारवाईत इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या मृत्यूच्या वृत्तानंतर पाकिस्तानातील अनेक शहरांत संतापाची लाट उसळली. विविध संघटनांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर निदर्शने केली. काही ठिकाणी ही आंदोलने हिंसक वळणावर गेल्याचे सांगितले जाते. कराचीसह काही भागांत सरकारी आणि परदेशी मालमत्तांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती आहे.

कराचीतील अमेरिकन वाणिज्य दूतावासाबाहेर मोठा जमाव जमला होता. पोलिसांनी प्रथम जमाव पांगवण्यासाठी अश्रुधूराचा वापर केला. मात्र परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर पोलिसांना गोळीबार करावा लागल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या कारवाईत किमान १० जणांचा मृत्यू झाला असून अनेक जखमी झाल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे.

नूर खान एअरबेससह पाकिस्तानमधील प्रमुख लष्करी तळांवर अफगाणिस्तानचा हल्ला

इराण रिव्होल्यूशनरी गार्डचे मुख्यालय अमेरिकेकडून उध्वस्त!

जेन झीचे डिजिटल जग, सस्टेनेबिलिटी आणि मानसिक आरोग्याला प्राधान्य

घरगुती कामांसाठी पारंपारिक 'बाई'वर अवलंबून राहण्याची पद्धत बदलली

दरम्यान, पाकिस्तान सरकारने संवेदनशील ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. अमेरिकन दूतावास आणि इतर परदेशी मिशन्सभोवती अतिरिक्त पोलीस आणि अर्धसैनिक दल तैनात करण्यात आले आहेत. अमेरिकन प्रशासनाने आपल्या नागरिकांना अत्यावश्यक कारणांशिवाय बाहेर पडू नये, तसेच परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे. व्हिसा प्रक्रिया स्थगित झाल्यामुळे विद्यार्थी, व्यावसायिक आणि कुटुंबीय व्हिसासाठी अर्ज केलेल्या नागरिकांना तात्पुरता फटका बसणार आहे. परिस्थिती स्थिर झाल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल, असे दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka