एक्सवरील पोस्टबद्दल व्यक्त केला खेद
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर ११ ऑक्टोबर रोजी केलेल्या पोस्टबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला असून, या प्रकरणात पुढील कारवाई करू नये, अशी विनंती भारताचे ऍटर्नी जनरल यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात त्यांनी १५ ऑक्टोबर रोजी पत्र लिहिले असून, ते आपल्या एक्स खात्यावरही पोस्ट केले आहे.
निखील वागळे यांच्या म्हणण्यानुसार, ११ ऑक्टोबर रोजी ते नवी दिल्लीतील घडामोडींचे सोशल मीडियावर प्रसारित होणारे व्हिडिओ पाहत होते. त्याचदरम्यान, ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी १० ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषदेत सर्वोच्च न्यायालयावरील विश्वास गमावल्याचे आणि वारंवार न्यायालयात जाण्याचा कंटाळा आल्याचे वक्तव्य केल्याचे वृत्त त्यांनी वाचले होते. या घडामोडींमुळे निर्माण झालेल्या संतापातून आणि निराशेतून आपण पोस्ट केली; मात्र, ती करायला नको होती, असे वागळे यांनी पत्रात मान्य केले आहे.
संबंधित पोस्ट भावनिक उद्रेकातून केली होती, असे सांगत वागळे यांनी ती हटवल्याचे स्पष्ट केले. आपल्या कृतीचे समर्थन करणार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. सार्वजनिक जीवनातील जवळपास पाच दशकांच्या कारकिर्दीत भाषणांमध्ये किंवा लेखनात अपमानास्पद भाषेचा वापर केला नसल्याचे सांगून, ही पोस्ट आपल्या अभिव्यक्तीच्या नेहमीच्या पद्धतीचे प्रतिनिधित्व करत नसल्याचे त्यांनी नमूद केले.
मक्कातील मशिदीच्या पावित्र्यभंगाचा आरोप; दोन बांगलादेशींना फाशी
हवेत उडी, गिरकी आणि लँडिंग! टेस्लाची 'रोडस्टर' चर्चेत
अमेरिकेत हिंदू मंदिरावर हल्ल्याची २ वर्षांपासून आखत होता योजना
रामलीलामध्ये रावण-कुंभकर्णासोबत ३० फुटांच्या 'कॉकरोच'चेही दहन
निखील वागळे यांनी आपण भारतीय संविधानावर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर विश्वास ठेवत असल्याचे सांगितले. सध्या स्वतंत्र डिजिटल माध्यम पत्रकार म्हणून काम करत असून, कोणत्याही राजकीय पक्षाचे सदस्य नसल्याचेही त्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे. सर्वोच्च न्यायालयाबद्दल आपल्या मनात सर्वोच्च आदर असल्याचे सांगत, पोस्ट करण्यामागील परिस्थिती आणि बिनशर्त माफी विचारात घेऊन पुढील कारवाई करू नये, अशी विनंती त्यांनी केली. दरम्यान, या प्रकरणी ऍडव्होकेट-ऑन-रेकॉर्ड अमिता सचदेवा यांनी १२ ऑक्टोबर रोजी वागळे यांना कायदेशीर नोटीस पाठवली होती.

