Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पडद्यावर सैनिक साकारला, पुढे कारगिलच्या रणभूमीवर केलेली सेवा

पडद्यावर सैनिक साकारला, पुढे कारगिलच्या रणभूमीवर केलेली सेवा

NEWS डंका 2 weeks ago

नाना पाटेकरांचे लष्कराशी होते खास नाते

पडद्यावर आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा अध्याय म्हणजे भारतीय लष्कराशी असलेले त्यांचे नाते.

१९९९च्या कारगिल युद्धावेळी त्यांनी चक्क आपल्या अभिनय कारकिर्दीतून ब्रेक घेत सैनिकांसोबत सीमेवर सेवा बजावली होती. या काळात त्यांनी सुमारे ६० दिवस लष्करासोबत घालवले होते.

नाना पाटेकर यांचा लष्कराशी संबंध कारगिल युद्धाच्या आधीच निर्माण झाला होता. १९९१ मध्ये आलेल्या 'प्रहार : द फायनल अटॅक' या चित्रपटातील कमांडोची भूमिका वास्तवदर्शी करण्यासाठी त्यांनी मराठा लाइट इन्फंट्रीसोबत सुमारे तीन वर्षे लष्करी प्रशिक्षण घेतले होते. या प्रशिक्षणादरम्यान त्यांचा लष्करातील जवान आणि अधिकाऱ्यांशी जवळचा संबंध निर्माण झाला. पुढे ते टेरिटोरियल आर्मीसोबतही जोडले गेले.

१९९९ मध्ये कारगिल युद्ध सुरू झाल्यानंतर नाना यांनी युद्धक्षेत्रात जाऊन सैनिकांसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली. मात्र, त्यांना थेट परवानगी देण्यात आली नाही. त्यानंतर नाना यांनी तत्कालीन संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्याशी संपर्क साधला. विशेष परवानगी मिळाल्यानंतर ते लष्करासोबत कारगिलच्या भागात गेले. त्यांना मानद कॅप्टन म्हणून सेवा करण्याची संधी मिळाली.

कारगिलमध्ये नाना यांनी सैनिकांसोबत प्रत्यक्ष काम केले. उपलब्ध वृत्तांनुसार, त्यांनी क्विक रिस्पॉन्स टीमसोबत काम करण्याबरोबरच नियंत्रण रेषेजवळ गस्त आणि लष्करी रुग्णालयातील कामातही सहभाग घेतला. द्राससह काही संवेदनशील भागात त्यांनी वेळ घालवला. या काळातील कठीण भौगोलिक आणि हवामानाच्या परिस्थितीचा त्यांच्या शरीरावरही परिणाम झाला. नाना यांनी स्वतः सांगितल्यानुसार, ते सुमारे ७६ किलो वजनाचे असताना कारगिलमध्ये गेले आणि परतताना त्यांचे वजन ५६ किलो झाले होते.

अंबानींवर निशाणा साधला; केंद्राने केला खुलासा

'मी उद्या इथे असेन की नाही, माहीत नाही'

पोलिसांना धक्काबुक्की प्रकरणी राहुल गांधींसह प्रियांका गांधींवर एफआयआर

अनेक पिढ्यांच्या स्मरणात राहील 'नानां'चा अभिनय!

नाना पाटेकर यांच्या निधनानंतर त्यांच्या अभिनय कारकिर्दीबरोबरच त्यांच्या आयुष्यातील हा लष्करी प्रवासही पुन्हा चर्चेत आला आहे. 'प्रहार'साठी घेतलेले लष्करी प्रशिक्षण असो किंवा कारगिल युद्धाच्या काळात प्रत्यक्ष सैनिकांसोबत घालवलेले दिवस, नानांचे लष्कराशी असलेले नाते केवळ पडद्यापुरते मर्यादित नव्हते, हे त्यांच्या या प्रवासातून स्पष्ट होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka