Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पाकव्याप्त काश्मीर आणि अफगाण सीमेजवळ चीनचा नवा प्रांत

पाकव्याप्त काश्मीर आणि अफगाण सीमेजवळ चीनचा नवा प्रांत

NEWS डंका 1 month ago

नव्या जिल्ह्याच्या स्थापनेमुळे भारताला धोका

चीनने पाकिस्तानव्याप्त काश्मीर (पीओके) आणि अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या शिनजियांग प्रदेशात एक नवीन काउंटी (पूर्ण प्रशासनिक युनिट) स्थापन केली आहे.

यामुळे भारतासाठी धोका निर्माण झाला आहे. डिसेंबर २०२४ पासून बीजिंगने या अशांत प्रदेशात तयार केलेली ही तिसरी काउंटी आहे. नवीन जिल्ह्याचे स्थान चीनसाठी त्याचे सामरिक महत्त्व अधोरेखित करते. मात्र, ही भारतासाठी चिंतेची बाब आहे.

चीनने नैऋत्य शिनजियांगमध्ये, काराकोरम पर्वतरांगेजवळ सेनलिंग काउंटीची स्थापना केली आहे. शिनजियांग उइघुर स्वायत्त प्रदेशाच्या सरकारने २६ मार्च रोजी या नवीन काउंटीच्या स्थापनेची घोषणा केली. जरी सेनलिंगचे नेमके प्रशासकीय विभाग आणि सीमा स्पष्ट झालेल्या नसल्या तरी, या परगण्याचे प्रशासन काशगर प्रांतामार्फत चालवले जाईल असे वृत्त आहे. प्राचीन रेशीम मार्गावरील (सिल्क रूट) काश्गर शहर हे चीनला दक्षिण आणि मध्य आशियाशी जोडणारे एक महत्त्वाचे प्रवेशद्वार आहे.

बीजिंगच्या महत्त्वाकांक्षी 'बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह' (BRI) चा एक भाग असलेल्या 'चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर' (CPEC) चा हा प्रारंभ बिंदू असल्यामुळे त्याचे महत्त्व अधिकच वाढले आहे. भारताने ६२ अब्ज डॉलर्सच्या सीपीईसी पायाभूत सुविधा प्रकल्पाला विरोध केला आहे, कारण हा प्रकल्प पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधून जात असल्यामुळे भारताच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन करतो.

मालदा हिंसाचार प्रकरणी काँग्रेस कार्यकर्ते शाहदात आणि आसिफ अटकेत

२००२ गुजरात दंगल प्रकरणात नऊ हिंदू निर्दोष

स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांना आज दादरच्या हिंदू स्मशानभूमीत अखेरचा निरोप

'युद्ध संपलेले नाही'; बुलेटप्रुफ जॅकेटमध्ये नेतान्याहूंचा दक्षिण लेबनॉन दौरा

भारतासाठी सेनलिंग चिंतेचा विषय का आहे?

सेनलिंग हा गेल्या वर्षभरात शिनजियांगमध्ये स्थापन झालेला तिसरा नवीन जिल्हा आहे. इतर दोन होतेन प्रांताअंतर्गत असलेले हेन आणि हेकांग आहेत. गेल्या वर्षी, हेन आणि हेकांगच्या निर्मितीवरून भारताने चीनकडे निषेध नोंदवला होता, कारण त्यांच्या अधिकारक्षेत्राचा भाग लडाख या भारताच्या केंद्रशासित प्रदेशात येतो. हेनमध्ये वादग्रस्त अक्साई चीन पठाराचा बराचसा भाग समाविष्ट आहे, जो लडाखचा एक भाग आहे. १९६२ च्या युद्धात चीनने त्यावर कब्जा केला होता आणि भारत-चीन सीमा विवादात तो एक प्रमुख वादाचा मुद्दा राहिला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka