Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पाकिस्तानच्या क्वेटामध्ये स्फोटामुळे रेल्वेचे दोन डबे घसरले; मोठी जीवितहानी

पाकिस्तानच्या क्वेटामध्ये स्फोटामुळे रेल्वेचे दोन डबे घसरले; मोठी जीवितहानी

२३ जणांचा मृत्यू, ४७ जखमी

पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांताची राजधानी क्वेटा पुन्हा एकदा भीषण दहशतवादी हल्ल्याने हादरली आहे. रविवारी सकाळी प्रवासी आणि सुरक्षा दलातील जवानांना घेऊन जाणाऱ्या रेल्वेजवळ झालेल्या प्रचंड बॉम्बस्फोटामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

चमन फाटक रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळांखाली लपवून ठेवलेल्या शक्तिशाली स्फोटकाचा स्फोट होताच रेल्वेचे दोन डबे रुळावरून घसरले आणि परिसरात धुराचे मोठमोठे लोट पसरले. स्फोट इतका तीव्र होता की अनेक किलोमीटर दूरपर्यंत त्याचा आवाज ऐकू आला. या भीषण घटनेत किमान २४ जणांचा मृत्यू झाला असून ५० हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अनेक जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

'सेमिकंडक्टर'चं शहर उभं राहतंय: धोलेरा

PSLV तंत्रज्ञान भारतीय खासगी कंपन्यांना हस्तांतरित होणार; काय आहे फायदा?

शिर्डीत आता क्षेपणास्त्रे, तोफगोळे, ड्रोन यांचे उत्पादन

स्फोटानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. जखमी प्रवासी मदतीसाठी आरडाओरडा करत होते, तर काही जण रक्तबंबाळ अवस्थेत रेल्वे रुळांजवळ पडलेले दिसत होते. स्थानिक नागरिकांनी आणि बचाव पथकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. पोलीस, सैन्य आणि आपत्कालीन सेवांचे पथक काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने क्वेटातील सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले असून अनेकांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. स्फोटामुळे रेल्वेचे मोठे नुकसान झाले असून आसपासच्या इमारतींच्या काचा फुटल्या आहेत.

या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नसली तरी बलुचिस्तानमध्ये सक्रिय असलेल्या दहशतवादी आणि फुटीरतावादी संघटनांवर संशय व्यक्त केला जात आहे. विशेषतः बलुच लिबरेशन आर्मीसारख्या संघटना याआधीही पाकिस्तानच्या सुरक्षा दलांवर आणि रेल्वे मार्गांवर हल्ले करत आल्या आहेत. बलुचिस्तान हा पाकिस्तानातील सर्वात संवेदनशील आणि अस्थिर भाग मानला जातो. येथे गेल्या अनेक वर्षांपासून फुटीरतावादी हिंसाचार सुरू असून पाकिस्तान सरकारला सतत सुरक्षेचे मोठे आव्हान उभे राहत आहे.

या भीषण घटनेनंतर पाकिस्तान सरकारने संपूर्ण क्वेटा शहरात हाय अलर्ट जारी केला आहे. रेल्वे स्थानके, सरकारी कार्यालये आणि लष्करी तळांवर अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. संशयितांचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले असून गुप्तचर यंत्रणांनाही सतर्क करण्यात आले आहे. दरम्यान, वाढत्या दहशतवादी घटनांमुळे पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. बलुचिस्तानमध्ये वाढणारा हिंसाचार आणि सातत्याने होणारे हल्ले पाकिस्तान सरकारसमोर मोठे आव्हान बनत चालले आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka