Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पाकिस्तानात मदरशासाठी १०० वर्ष जुनं हिंदू मंदिर पाडलं?

पाकिस्तानात मदरशासाठी १०० वर्ष जुनं हिंदू मंदिर पाडलं?

NEWS डंका 2 weeks ago

सरकार म्हणतं मुसळधार पावसाने कोसळलं

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील नरोवाल जिल्ह्यातील सिराज गावात १०० ते १२५ वर्षे जुनं हिंदू मंदिर पाडल्याच्या घटनेवरून वाद निर्माण झाला आहे. २१ ऑगस्ट रोजी ही घटना घडली.

अल्पसंख्याक संघटना आणि स्थानिक हिंदू समुदायाने मंदिर जाणीवपूर्वक पाडण्यात आल्याचा आरोप केला आहे. मात्र, पाकिस्तानच्या इव्हॅक्युई ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्ड (ETPB) ने मंदिर मुसळधार पावसामुळे कोसळल्याचा दावा केला आहे.

हे मंदिर सुमारे १,००० चौरस मीटर परिसरात उभं होतं. नरोवाल हे लाहोरपासून सुमारे १३० किलोमीटर अंतरावर आहे. पाकिस्तानातील अल्पसंख्याकांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या पाकिस्तान मसीहा मिल्लत पार्टीने (PMMP) मंदिर पाडल्याप्रकरणी कारवाई करण्याची आणि मंदिराची मूळ स्वरूपात पुनर्बांधणी करण्याची मागणी केली आहे. पार्टीचे अध्यक्ष अस्लम परवेज सहोत्रा यांनी २८ ऑगस्ट रोजी पंजाबच्या अतिरिक्त गृह सचिवांची भेट घेऊन या प्रकरणी लेखी तक्रार दाखल केली. मंदिर पाडणाऱ्यांवर तसेच मंदिराचं संरक्षण करण्यात अपयशी ठरलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

सहोत्रा यांच्या आरोपानुसार, मंदिराशेजारील जमीन पूर्वी एका मदरशासाठी भाडेतत्त्वावर देण्यात आली होती. मात्र, अनेक वर्षे भाडं न भरल्याने आणि जमीन ज्या उद्देशासाठी देण्यात आली होती, त्यासाठी तिचा वापर न झाल्याने हा करार रद्द करण्यात आला होता. त्यानंतर या परिसरातील काही भागांवर बेकायदा कब्जा करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. मंदिर पाडल्यानंतर त्याच्या शिखरावरील धातूचे साहित्य, विटा आणि इतर बांधकाम साहित्य हटवण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. मंदिराची जमीन मदरशात समाविष्ट करण्याच्या उद्देशाने ही कारवाई करण्यात आल्याचा दावा अल्पसंख्याक प्रतिनिधींनी केला आहे.

सरकारचा दावा काय?

या आरोपांना पाकिस्तान सरकारच्या अधिकाऱ्यांनी नकार दिला आहे. वरिष्ठ अधिकारी राणा इफ्तिखार यांनी मंदिर पाडण्यात आल्याचा दावा फेटाळून लावत, मुसळधार पावसामुळे जुनं मंदिर कोसळल्याचं सांगितलं. मात्र, हे मंदिर १०० ते १२५ वर्षांहून अधिक जुनं असल्याचं त्यांनी मान्य केलं आहे. मंदिराची स्वतःची जमीन कोणालाही भाडेतत्त्वावर देण्यात आलेली नसून, मंदिराशेजारील जमीन मदरशासाठी भाड्याने देण्यात आली होती, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

२७ रुपये रिक्षा, ३३ रुपये टॅक्सी! मुंबईकरांच्या प्रवासाचा खर्च वाढला

टाइम्स स्क्वेअरमध्ये चाकू हल्ला; पोलिसांच्या गोळीबारात आरोपी महिला ठार

मेस्सीची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती

राहुल गांधी आता बोला…काँग्रेसच्या राज्यातले मौलवी म्हणाले, महिलांनी चार भिंतीत राहावे!

दरम्यान, हिंदू समुदायाचे नेते रतन लाल यांनी मंदिराच्या घटनेचा निषेध करत त्याची पुनर्बांधणी करण्याची मागणी केली आहे. प्रशासन आणि ETPBने मंदिराचं संरक्षण करण्यासाठी पुरेशी पावलं उचलली नाहीत, असा आरोप त्यांनी केला. मंदिराच्या जागेवर अजूनही मदरसा सुरू असल्याने स्थानिक हिंदूंना तिथे जाण्यास भीती वाटत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka