घटनेत एकाचा मृत्यू, एक जण जखमी
अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरमध्ये चाकू हल्ल्याची धक्कादायक घटना घडली. एका महिलेने अवघ्या २० सेकंदांच्या अंतराने दोन जणांवर चाकूने हल्ला केला.
या हल्ल्यात एका ३२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, तर ६८ वर्षीय पुरुष जखमी झाला. त्यानंतर पोलिसांनी हल्लेखोर महिलेला गोळ्या झाडून ठार केलं. ही घटना सोमवारी दुपारी सुमारे ४.३० वाजता (स्थानिक वेळेनुसार) टाइम्स स्क्वेअर परिसरात घडली. त्यावेळी या अत्यंत गजबजलेल्या पर्यटनस्थळी हजारो पर्यटक, नागरिक आणि कुटुंबीय उपस्थित होते. पोलिसांच्या माहितीनुसार, ४९ वर्षीय पामेला सिस्नेरोस हिने बॅगेतून दोन चाकू बाहेर काढले आणि अचानक लोकांवर हल्ला करण्यास सुरुवात केली.
सिस्नेरोसने सर्वप्रथम सबवे स्टेशनमधून बाहेर आलेल्या ६८ वर्षीय पुरुषाच्या पोटावर चाकूने वार केला. त्यानंतर अवघ्या काही सेकंदांत तिने एका ३२ वर्षीय महिलेवरही चाकूने हल्ला केला. दोन्ही जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, ३२ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर पुरुषाची प्रकृती स्थिर असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
हल्ल्यानंतर आरोपी महिला जवळच असलेल्या NYPD सबस्टेशनच्या दिशेने गेली. पोलिसांनी तिला दोन्ही चाकू खाली ठेवण्याचे अनेकदा आदेश दिले. मात्र, तिने आदेश नाकारले. पोलिसांनी तिला नियंत्रणात आणण्यासाठी टेजरचाही वापर केला; मात्र त्याचा परिणाम झाला नाही. त्यानंतर ती चाकू घेऊन पोलिसांच्या दिशेने पुढे सरकू लागली. त्यामुळे पोलिसांनी गोळीबार केला. पोलिस आयुक्त जेसिका टिश यांच्या माहितीनुसार, ही महिला पोलिसांशी सुमारे चार मिनिटे आमनेसामने होती. पोलिसांच्या आदेशानंतरही तिने शस्त्र खाली ठेवण्यास नकार दिला आणि पोलिसांना धमकी दिल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. गोळीबारानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र तिचा मृत्यू झाला.
मेस्सीची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती
राहुल गांधी आता बोला…काँग्रेसच्या राज्यातले मौलवी म्हणाले, महिलांनी चार भिंतीत राहावे!
दीप्ती शर्माचा विक्रम; सर्वाधिक विकेट्सचा मान!
घरातल्या निवडणुकीत जिंकता येत नाही, त्यांना पंतप्रधानांची उठाठेव!
पोलिसांनी या हल्ल्याला 'अचानक आणि कोणत्याही कारणाशिवाय केलेला हल्ला' असल्याचं म्हटलं आहे. सिस्नेरोसला मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या असल्याची माहितीही समोर आली आहे. प्राथमिक तपासात या घटनेचा दहशतवादाशी संबंध नसल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.

