Dailyhunt
पाकिस्तानातल्या लियारीतले लोक 'धुरंधर २' कडून आशा लावून बसलेत!

पाकिस्तानातल्या लियारीतले लोक 'धुरंधर २' कडून आशा लावून बसलेत!

NEWS डंका 1 month ago

धुरंधरने लियारीतही केला धमाका

धुरंधर चित्रपटाने जगभरात धूमशान घातले आहे. जगभरात या चित्रपटाचे कौतुक होत असून या चित्रपटात लियारी या पाकिस्तानातील ठिकाणाचा उल्लेख आहे आणि तिथे घडलेले सगळे खुनी राजकारण, हाणामारी, भारतीय गुप्तहेराची कथा हे आपल्याला चित्रपटात पाहायला मिळते.

धुरंधर २ मुळे लियारी हा भाग चांगलाच चर्चेत आला आहे.

आता लियारीतील लोकच या चित्रपटाबद्दल बोलू लागले आहेत. त्यांना या चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धर, निर्माते यांच्याकडून काही अपेक्षा आहेत.

पाकिस्तानमधील लियारी येथील रहिवाशांनी चक्क धुरंधर २ - द रिव्हेन्ज या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कमाईत हिस्सा मागितला आहे. काहींनी तर चित्रपटाच्या उत्पन्नातील ८० टक्क्यांपर्यंत रक्कम स्थानिक विकासासाठी देण्याची मागणी केली आहे. ही मागणी तेव्हा समोर आली, जेव्हा रणवीर सिंग अभिनीत या चित्रपटाने जागतिक स्तरावर १,००० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आणि कराचीतील त्या भागाकडे लक्ष वेधले, ज्यावर ही कथा आधारित आहे.

पश्चिम आशिया संघर्षाचा भारतात परिणाम

LPG टंचाईच्या पार्श्वभूमीवर PNG विस्ताराला गती

१ एप्रिलपासून रशियाची पेट्रोल निर्यात बंद

नेव्हिगेशनचे स्वातंत्र्य सुनिश्चित करणे आवश्यक

ऑनलाईन व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये स्थानिक लोकांनी असा युक्तिवाद केला की, चित्रपटाने लियारीचे नाव आणि पार्श्वभूमी वापरली असल्याने त्या समुदायाला आर्थिक फायदा मिळायला हवा. एका रहिवाशाने म्हटले की, 'भारताने या चित्रपटातून मिळालेले पैसे आम्हाला दिले तर इथे रस्ते आणि इतर पायाभूत सुविधा सुधारू शकतात, तर काहींनी शेकडो कोटी रुपये त्या भागातील सार्वजनिक कल्याणासाठी वापरण्याची मागणी केली.

लियारीतील लोक हिस्सा का मागत आहेत?

धुरंधर २ ने लियारीची ओळख आणि परिस्थितीचा फायदा घेतला आहे, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. रहिवाशांनी त्या भागातील खराब पायाभूत सुविधांकडे लक्ष वेधले. विशेषतः खराब रस्ते आणि सुविधांचा अभाव लायरीत आहे. चित्रपटाच्या व्यावसायिक यशाचा प्रत्यक्ष फायदा समुदायाला मिळायला हवा. काही स्थानिकांनी असा अंदाज व्यक्त केला की, ७०-८० टक्के कमाई ही आम्हाला मिळायला हवी.

दिग्दर्शक आदित्य धर यांच्या या चित्रपटात एका भारतीय गुप्तचर अधिकाऱ्याची कथा आहे, जो लियारीतील गुन्हेगारी नेटवर्कमध्ये काम करताना गुप्त मोहिम पार पाडतो. कथा त्याच्या अंडरवर्ल्डमधील प्रवास आणि उन्नती दाखवते.

या चित्रपटात अर्जुन रामपाल, राकेश बेदी, संजय दत्त, आर. माधवन, सारा अर्जुन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा सिक्वेल भलताच यशस्वी होत आहे. धुरंधरच्या पहिल्या भागातून १,३०० कोटी रुपयांची कमाई केली होती.

निर्मात्यांची प्रतिक्रिया काय?

आतापर्यंत यासंदर्भात आदित्य धर किंवा चित्रपटाच्या निर्मात्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka