Dailyhunt
पालघरमध्ये २५१ आदिवासी कुटुंबांची हिंदू धर्मात 'घरवापसी'

पालघरमध्ये २५१ आदिवासी कुटुंबांची हिंदू धर्मात 'घरवापसी'

NEWS डंका 3 weeks ago

विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने धार्मिक विधी पडल्या पार

पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे श्री हनुमान जयंतीच्या दिवशी हिंदू धर्मात 'घरवापसी'चा मोठा कार्यक्रम पार पडला. माहितीनुसार, २५१ आदिवासी कुटुंबांनी पुन्हा सनातन हिंदू धर्म स्वीकारला.

विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने बोईसरमधील अवध नगर येथील टीमा हॉल ग्राउंडवर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या वेळी विधीवत पूजन, हवन आणि धार्मिक विधी पार पडले.

आयोजकांच्या मते, गेल्या काही वर्षांत विविध कारणांमुळे या कुटुंबांनी धर्मांतर केले होते. मात्र आता त्यांनी स्वेच्छेने पुन्हा सनातन हिंदू धर्म स्वीकारला आहे. २५१ कुटुंबांतील ६०० हून अधिक लोकांनी एकत्रितपणे 'घरवापसी' केल्याचे सांगण्यात आले. विश्व हिंदू परिषद कोकण प्रांताचे मंत्री मोहन सालकर यांनी यावेळी सांगितले, 'सकाळी चुकलेला जर संध्याकाळी परत आला, तर त्याला चुकलेला म्हणत नाहीत. हे आपल्या आदिवासी बंधू-भगिनी काही दबाव किंवा प्रलोभनामुळे इतर पूजा पद्धतीकडे वळले होते. आता त्यांनी ती पद्धत सोडून आपल्या मूळ, नैसर्गिक सनातन हिंदू पूजा पद्धतीकडे पुनरागमन केले आहे. आज येथे असे २५१ कुटुंब उपस्थित आहेत. हा संदेश आहे की, जे अनेक वर्षे भरकटले होते, त्यांची परत येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.' त्यांनी पुढे असेही म्हटले की, जगाला शांतीचा मार्ग दाखवणारी संस्कृती सनातन धर्मातच आहे.

मालदा हिंसाचार प्रकरणात AIMIM नेत्यासह ३५ जणांना अटक

'समोशांबद्दल' बोलण्याऐवजी भाजपला संसदेत प्रश्न विचारा!

'नाही म्हणजे नाही!' ६ कोटी भरण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळणार नाही

पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वामध्ये पोलीस ठाण्यावर आत्मघाती हल्ला

पालघर जिल्ह्याच्या दृष्टीने हा पहिलाच असा कार्यक्रम असून, पुढील काळात मोठ्या संख्येने आपली मूळ आस्था बदललेले आदिवासी पुन्हा परत येण्याची इच्छा व्यक्त करत असल्याचे त्यांनी सांगितले. सहमंत्री चंदन सिंह यांनी सांगितले की, 'जे कुटुंब काही कारणांमुळे आपल्या मुळांपासून दूर गेले आहेत, त्यांना पुन्हा सनातन धर्माशी जोडणे हे आमचे कर्तव्य आहे.' या कार्यक्रमाला भाजप जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानचे संस्थापक मोहन सालेकर, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक कुंदन सिंह यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka