Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
परवडणाऱ्या घरांचा पुरवठा घटला

परवडणाऱ्या घरांचा पुरवठा घटला

NEWS डंका 2 weeks ago

एमएमआरमध्ये मात्र मध्यमवर्गाला मोठा दिलासा

देशातील प्रमुख शहरांमध्ये घरांच्या किमती सातत्याने वाढत असल्याने मध्यमवर्गीयांसाठी परवडणारे घर खरेदी करणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. महागाई, बांधकाम खर्च आणि जमीन दरातील वाढीचा परिणाम थेट घरांच्या किमतींवर होत असून, विकासकांकडूनही प्रीमियम आणि लक्झरी घरांच्या प्रकल्पांना अधिक प्राधान्य दिले जात आहे.

त्यामुळे देशातील प्रमुख सात शहरांमध्ये ८० लाख रुपयांपर्यंतच्या घरांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. मात्र, मुंबई महानगर प्रदेश अर्थात एमएमआरमध्ये परिस्थिती तुलनेने दिलासादायक आहे. या भागात नव्याने बाजारात आलेल्या घरांपैकी तब्बल ५१ टक्के घरे ८० लाख रुपयांपेक्षा कमी किमतीची आहेत. त्यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि आसपासच्या परिसरात घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मध्यमवर्गीयांसाठी एमएमआरची बाजारपेठ अजूनही काही प्रमाणात परवडणारी असल्याचे चित्र आहे.

अनारॉकच्या आकडेवारीनुसार, २०२६च्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत देशातील प्रमुख सात शहरांमध्ये सुमारे १ लाख १४ हजार ३२० नवीन घरांची विक्रीसाठी नोंद झाली. यामध्ये एमएमआरचा वाटा सर्वाधिक राहिला असून, या भागात सुमारे ३७ हजार ५०० नवीन घरांचा पुरवठा बाजारात आला. मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत हा पुरवठा सुमारे २७ टक्क्यांनी वाढला आहे. विशेष म्हणजे, एमएमआरमध्ये नव्याने लॉन्च झालेल्या घरांपैकी ५१ टक्क्यांहून अधिक घरे ८० लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या श्रेणीत आहेत. दुसरीकडे देशातील प्रमुख सात शहरांमध्ये या श्रेणीतील घरांचा वाटा केवळ सुमारे १४ टक्क्यांवर आला आहे. यावरून देशातील रिअल इस्टेट बाजारपेठ हळूहळू महागड्या घरांकडे सरकत असल्याचे स्पष्ट होते.

अमेरिकेत महागाईचा फटका; पगारवाढीचा वेग मंदावला

'त्या' ओमानी वैमानिकाच्या सोशल मीडियात अल कायदाच्या जवाहिरीचा फोटो

भारतीय क्षेपणास्त्र ब्रह्मोस-आकाशची जगभरात मागणी

एमएमआरमध्ये केवळ नवीन घरांचा पुरवठाच वाढलेला नाही, तर घरांची मागणीही मजबूत आहे. २०२६च्या तिसऱ्या तिमाहीत एमएमआरमध्ये सुमारे ३१ हजार ७५० घरांची विक्री झाली. मागील वर्षाच्या तुलनेत विक्रीत सुमारे ५ टक्के, तर मागील तिमाहीच्या तुलनेत ११ टक्के वाढ झाली आहे. मात्र, एमएमआरमधील सर्वच घरे मध्यमवर्गाच्या आवाक्यात आहेत असे नाही. या बाजारपेठेत १.५ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या घरांचा पुरवठाही मोठा आहे. त्यामुळे घराची किंमत, स्थान, आकार आणि उपलब्ध सुविधांनुसार ग्राहकांना मोठा फरक जाणवतो. तरीही देशातील इतर प्रमुख महानगरांच्या तुलनेत एमएमआरमध्ये ८० लाख रुपयांखालील घरांचा ५१ टक्क्यांहून अधिक पुरवठा हा महत्त्वाचा संकेत मानला जात आहे. वाढत्या किमतींच्या काळात मध्यमवर्गीय घरखरेदीदारांसाठी हा पुरवठा आगामी काळात मागणी टिकवून ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka