Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
फेसबुक लाईव्ह दरम्यान अमली पदार्थविरोधी कार्यकर्त्यावर झाडल्या गोळ्या

फेसबुक लाईव्ह दरम्यान अमली पदार्थविरोधी कार्यकर्त्यावर झाडल्या गोळ्या

पंजाबमधील घटना

पंजाबमधील मानसा येथे अमली पदार्थांच्या कथित अवैध विक्रीविरोधात आवाज उठवणारे कार्यकर्ते परविंदर सिंह झोटा यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. औषध विक्रीच्या दुकानात अमली पदार्थ विकले जात असल्याचा आरोप करत त्यांनी दुकानदाराला जाब विचारला.

यावेळी दोघांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर दुकानदाराने झोटा यांच्यावर गोळीबार केला. धक्कादायक बाब म्हणजे ही संपूर्ण घटना झोटा यांच्या फेसबुक लाईव्हमध्ये कैद झाली. या गोळीबारात त्यांचे काही साथीदारही जखमी झाले आहेत.

संबंधित घटना सोमवारी सकाळी घडल्याचे वृत्त आहे. झोटा हे आपल्या सहकाऱ्यांसह औषध विक्रीच्या दुकानात गेले होते. त्या दुकानातून एका वृद्ध व्यक्तीने अमली पदार्थ खरेदी केल्याचा दावा करत त्यांनी दुकानदाराला प्रश्न विचारले. संबंधित व्यक्तीकडूनही त्यांनी याबाबत माहिती घेतली. दुकानातील सीसीटीव्ही चित्रण दाखवण्याची मागणीही त्यांनी केली. या वादादरम्यान दुकानदाराच्या हातात पिस्तूल दिसल्याचे व्हिडिओतून समोर आले. झोटा यांनी त्याला पिस्तूल बाळगण्याबाबत जाब विचारला. दोघांमधील वाद वाढत गेल्यानंतर दुकानदाराने झोटा यांच्यावर जवळून गोळ्या झाडल्याचा आरोप आहे. त्यानंतर झोटा यांचा मोबाईल खाली पडला आणि फेसबुक लाईव्ह बंद झाले.

गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या झोटा यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या सहकाऱ्यांनाही गोळ्या लागल्या असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मानसा येथील नागरी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, झोटा यांच्या पोटात दोन आणि मांडीमध्ये एक अशा तीन गोळ्या लागल्या होत्या. त्यापैकी एका गोळीमुळे यकृताला दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

दिवाळीनंतर युपीआय व्यवहारांवर शुल्क

जंतर मंतरमध्ये घुसलेल्या 'कॉक्रोच'ना घेतले ताब्यात

प्रिय सूर्यकांत, राजीनामा द्या….काँग्रेसने पोस्ट केली डीलिट

'दीपस्तंभ'ची त्या मुलींना साथ, 'भारतीय स्त्री शक्ती'चा मदतीचा हात

अमली पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात सक्रिय

परविंदर सिंह झोटा हे मानसा आणि आसपासच्या परिसरात अनेक वर्षांपासून अमली पदार्थांच्या व्यसनाविरोधात तसेच काही औषध विक्रीच्या दुकानांमधून नशा आणणाऱ्या पदार्थांची कथित अवैध विक्री होत असल्याच्या विरोधात मोहीम राबवत होते. ते 'फोर्स' नावाच्या संघटनेशी संबंधित होते. या विषयावर त्यांनी केलेले व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होत असत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka