Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुण्यातील विषारी दारूत भिवंडीतील मेथेनॉल!

पुण्यातील विषारी दारूत भिवंडीतील मेथेनॉल!

NEWS डंका 3 weeks ago

दारूकांडानंतर एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांची धडक कारवाई

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारू प्रकरणात १८ जणांचा मृत्यू झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी कारवाई करत भिवंडीतील एका कंपनीवर धाड टाकून तब्बल ५,९२९ किलो मेथेनॉलचा साठा जप्त केला आहे.

या प्रकरणी कंपनीच्या मालकांसह संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून परवाना रद्द करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.

एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी, दापोडी आणि हडपसर परिसरात गावठी दारूमध्ये विषारी मेथेनॉल मिसळल्यामुळे १८ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाच्या तपासात वापरण्यात आलेले मेथेनॉल भिवंडीतील 'रेक्स इंटरनॅशनल' या कंपनीकडून मिळाल्याचे समोर आले.
त्यानुसार ठाणे येथील औषध निरीक्षकांनी भिवंडीतील कंपनीच्या गोदामावर छापा टाकला.

१ जूनला दिल्लीत भाजपच्या सर्व प्रदेशाध्यक्षांची महत्त्वपूर्ण बैठक

रेतीच्या ढंगानी राजस्थानचे पाच जिल्हे व्यापले

बनावट सही प्रकरणी अभिषेक बॅनर्जींना सीआयडीचे समन्स

अमेरिकेतील ग्रीन कार्ड अर्जदारांना मोठा दिलासा

तपासादरम्यान कंपनीकडे मेथेनॉलच्या खरेदी-विक्रीची कोणतीही अधिकृत नोंद, साठा नोंदवही किंवा आवश्यक कागदपत्रे आढळून आली नाहीत. त्यामुळे गैरवापर टाळण्यासाठी संपूर्ण साठा जप्त करण्यात आला.
या प्रकरणी कंपनीचे मालक अरुणकुमार चौबे आणि सक्षम व्यक्ती अभिषेक अरुणकुमार चौबे यांच्याविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. तसेच विषारी द्रव्य अधिनियमांतर्गत कारणे दाखवा नोटीस बजावून कंपनीचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

या कारवाईमुळे अवैध दारू विक्रेते आणि मेथेनॉल पुरवठादार यांच्यातील कथित साखळी उघडकीस आली असून राज्यातील इतर भागांतही अशा प्रकारचे रॅकेट कार्यरत आहे का, याची चौकशी करण्याची गरज व्यक्त होत आहे.

दरम्यान, आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषधांच्या बाबतीतील कोणतेही बेकायदेशीर काम खपवून घेतले जाणार नसल्याचा इशारा दिला आहे. नागरिकांनी संशयास्पद औषधे, अवैध साठवणूक किंवा भेसळीबाबत तातडीने एफडीएकडे तक्रार करण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka