Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पूर्व युक्रेनमधील कोस्तांतिनोवकावर रशियाचा ताबा

पूर्व युक्रेनमधील कोस्तांतिनोवकावर रशियाचा ताबा

NEWS डंका 3 weeks ago

णनीतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे शहर म्हणत पुतिन यांचा दावा

रशिया-युक्रेन युद्धादरम्यान रशियाने आणखी एक मोठा दावा केला आहे. क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी पूर्व युक्रेनमधील कोस्तांतिनोवका शहरावर रशियन सैन्याने पूर्ण नियंत्रण मिळवल्याचे सांगितले.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी या शहरावरील ताबा रणनीतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असल्याचे म्हटले आहे. आरआयए नोवोस्तीच्या वृत्तानुसार, पेस्कोव्ह यांनी शुक्रवारी सांगितले की, 'कोस्तांतिनोवका शहरावर पूर्णपणे ताबा मिळवण्यात आला आहे.' कोस्तांतिनोवका हे युक्रेनच्या डोनेत्स्क प्रदेशातील महत्त्वाचे औद्योगिक आणि वाहतूक केंद्र मानले जाते.

या घोषणेनंतर राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी संयुक्त लष्करी दलाच्या (CJTF) तात्पुरत्या कमांड पोस्टला भेट दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, 'कोस्तांतिनोवका हे डोनबासमधील प्रमुख वाहतूक केंद्र आणि मोठे औद्योगिक शहर आहे. २०२६ च्या सुरुवातीपासून रशियन सैन्याने डोनबास आणि नोवोरोसिया भागातील १३३ वसाहतींसह ३,००० चौरस किलोमीटरहून अधिक भूभागावर नियंत्रण मिळवले आहे.'

युक्रेनकडून रशियाच्या सीमावर्ती आणि निवासी भागांवर सातत्याने हल्ल्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप करत पुतिन म्हणाले की, 'युक्रेन जितक्या वेळा असे हल्ले करेल, तितक्या मोठ्या प्रमाणात सुरक्षा बफर झोन निर्माण करण्याची गरज रशियाला भासेल.' पुतिन यांनी यावेळी आणखी एक मोठा दावा करत लुहान्स्क पीपल्स रिपब्लिक पूर्णपणे मुक्त करण्यात आल्याचे सांगितले. तसेच डोनेत्स्क पीपल्स रिपब्लिकमधील उर्वरित भाग, झापोरिझ्झिया आणि खेरसॉन प्रदेशांमध्ये युक्रेनच्या सैन्याविरोधातील कारवाया सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

'ही खऱ्या बंधुत्वाची भावना'; व्हेनेझुएलाकडून भारताचे आभार

ग्रूमिंग गँगचा म्होरक्या शब्बीरसाठी ब्रिटनचा पाकिस्तानवर दबाव

'आमचाच गट खरा' म्हणत ऋतुव्रत बॅनर्जी यांनी घेतला तृणमूल मुख्यालयाचा ताबा

राम मंदिरातील देणगी गैरव्यवहारानंतर कर्मचाऱ्यांना 'नो पॉकेट गाऊन'

दरम्यान, मॉस्कोचे महापौर सर्गेई सोब्यानिन यांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियन हवाई संरक्षण यंत्रणेने शुक्रवारी पहाटेपासून मॉस्कोकडे येणारे २८ ड्रोन पाडले. याशिवाय शुक्रवारी रात्री राजधानीच्या दिशेने येणारे आणखी आठ ड्रोनही नष्ट करण्यात आले असून, ड्रोनचा मलबा पडलेल्या ठिकाणी आपत्कालीन पथके कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka