Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
राम मंदिरातील देणगी गैरव्यवहारानंतर कर्मचाऱ्यांना 'नो पॉकेट गाऊन'

राम मंदिरातील देणगी गैरव्यवहारानंतर कर्मचाऱ्यांना 'नो पॉकेट गाऊन'

NEWS डंका 3 weeks ago

नियमांमध्ये मोठे बदल

योध्येतील राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणानंतर श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने देणगी मोजणी प्रक्रियेत मोठे बदल केले आहेत. कर्मचाऱ्यांसाठी खिसेविरहित (Pocketless) विशेष गाऊन, वारंवार शारीरिक तपासणी, सीसीटीव्ही देखरेख आणि शौचालयासाठी जाण्यावरही कडक नियंत्रण अशा अनेक नव्या सुरक्षा उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत.

या बदलांचा उद्देश मंदिरातील देणग्यांची पारदर्शकता वाढवणे आणि भविष्यात अशा प्रकारच्या गैरव्यवहारांना आळा घालणे हा आहे.

अलीकडेच मंदिरातील देणगी मोजणी प्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप समोर आल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने विशेष तपास पथक (SIT) नेमले होते. या तपासात अनेक प्रक्रियात्मक त्रुटी आणि सुरक्षा व्यवस्थेतील उणिवा समोर आल्यानंतर ट्रस्टने संपूर्ण यंत्रणाच बदलण्याचा निर्णय घेतला. नवीन नियमांनुसार देणगी मोजणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना आता आकाशी निळ्या रंगाचा खिसेविरहित विशेष गाऊन परिधान करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या गाऊनला मानेजवळ झिप असून तो फक्त देणगी मोजणी कक्षातच वापरता येणार आहे. यासाठी स्वतंत्र चेंजिंग रूम तयार करण्यात आली असून कर्मचारी ड्युटी सुरू करण्यापूर्वी आपले सामान्य कपडे बदलून हा गणवेश घालतील आणि काम संपल्यानंतरच पुन्हा स्वतःचे कपडे परिधान करतील.

देणगी मोजणी कक्षात प्रवेश करण्यापूर्वी कर्मचाऱ्यांची एकदाच नव्हे तर अनेक टप्प्यांत तपासणी केली जात आहे.

एवढेच नाही, तर काम सुरू असताना एखाद्या कर्मचाऱ्याला शौचालयात जायचे असल्यास बाहेर पडताना आणि परत येताना पुन्हा तपासणी केली जाणार आहे.

तपासादरम्यान काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या कव्हरेजमध्ये त्रुटी असल्याचे समोर आले होते. त्यामुळे आता सर्व 'ब्लाइंड स्पॉट्स' दूर करण्यात आले असून संपूर्ण देणगी मोजणी प्रक्रिया अधिक प्रभावी सीसीटीव्ही देखरेखीखाली आणण्यात आली आहे. याशिवाय, प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून सुरक्षा व्यवस्थाही अधिक मजबूत करण्यात आली आहे.

मुंबईत मुसळधार; किनारपट्टीला रेड अलर्ट!

तृणमूलच्या बंडखोर गटाने पक्षाच्या मुख्यालयावर ताबा मिळवल्याचा दावा

३६ वर्षात देशभरातील ३०० हून अधिक आलिशान हॉटेलांना घातला गंडा; ठगाला अटक

अंधेरीतील SRA इमारतीला भीषण आग

देणगी मोजणी कशी होते?

राम मंदिर परिसरात सुमारे ३५ ते ४० देणगी पेट्या आहेत. या पेट्यांमधील रोकड दररोज मंदिरापासून सुमारे २०० मीटर अंतरावर असलेल्या पिलग्रिम फॅसिलिटेशन सेंटर (PFC) मधील तळघरात नेली जाते. येथे दोन शिफ्टमध्ये सुमारे २०-२० कर्मचारी देणगी मोजण्याचे काम करतात. सामान्य दिवशी मंदिरात सुमारे ७५ लाख रुपयांपर्यंत देणगी जमा होते, तर सण-उत्सवांच्या काळात हा आकडा अनेक कोटी रुपयांपर्यंत पोहोचतो.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka