Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
राहुलचा रनस्फोट!' ऑरेंज कॅपवर कब्जा!

राहुलचा रनस्फोट!' ऑरेंज कॅपवर कब्जा!

NEWS डंका 3 weeks ago

यपीएल २०२६ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा प्रमुख फलंदाज केएल राहुल जबरदस्त फॉर्ममध्ये परतला असून त्याने हंगामातील सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅप आपल्या नावावर केली आहे.

जयपूर येथे राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळलेल्या सामन्यात राहुलने ४० चेंडूत ७५ धावांची तुफानी खेळी साकारत दिल्लीला २२६ धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करून दिला.

या कामगिरीनंतर तो धावांच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचला.

राहुलने आतापर्यंत ९ सामन्यांच्या ९ डावांत ४३३ धावा केल्या असून त्याची सरासरी ५४.१२ आणि स्ट्राइक रेट १८५.८३ इतका प्रभावी आहे. त्याने या हंगामात १ शतक आणि ३ अर्धशतके झळकावली आहेत. विशेष म्हणजे, पंजाबविरुद्ध त्याने केलेली नाबाद १५२ धावांची खेळी ही आयपीएलमधील भारतीय फलंदाजाची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली आहे.

हेही वाचा :

एप्रिल २०२६: कार विक्रीत विक्रमी वाढ

इस्लामाबादमध्ये हिजबुल मुजाहिद्दीनच्या कमांडरचा मृतदेह सापडला

जर्मनीतून ५,००० अमेरिकन सैनिकांना माघारी बोलावणार

जनगणनेचा शुभारंभ झालाय, उत्साहाने सामील व्हा…

धावांच्या शर्यतीत सनरायझर्स हैदराबादचा अभिषेक शर्मा (४२५ धावा) दुसऱ्या स्थानावर आहे, तर त्याच संघाचा हेनरिक क्लासेन (४१४ धावा) तिसऱ्या क्रमांकावर आहे. राजस्थान रॉयल्सचा वैभव सूर्यवंशी (४०४ धावा) चौथ्या स्थानावर असून, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा विराट कोहली (३७९ धावा) पाचव्या स्थानी आहे.

या यादीत क्लासेन वगळता सर्व फलंदाज सलामीला येणारे आहेत. स्पर्धा जसजशी पुढे सरकत आहे, तसतशी ऑरेंज कॅपसाठीची चुरस आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka