Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
राम काय तुमच्या बापाचा आहे का? आम्हीच रामभक्त

राम काय तुमच्या बापाचा आहे का? आम्हीच रामभक्त

NEWS डंका 0 months ago

मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी केली सरकारवर टीका

दिल्लीतील जंतर मंतर येथे झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूनी मुंबईत मोर्चाचे आयोजन केले होते. पण दिल्लीतील आंदोलन संपल्यामुळे या मोर्चाऐवजी सभा घेण्याचे ठरले.

त्यानिमित्ताने उद्धव ठाकरे यांची एक मुलाखत संजय राऊत यांनी घेतली. त्यात उद्धव ठाकरे यांनी सरकारला सवाल विचारला की, राम काय तुमच्या बापाचा आहे काय?

उद्धव ठाकरेंना विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, रामाचे संरक्षण करणारे तुम्ही कोण? तुम्हाला अधिकार दिला कोणी? 'आम्ही रामभक्त आहोत. राम तुमच्या बापाचा आहे का? राम आमच्या सगळ्यांचा आहे. तुम्ही रामाच्या आडून पापं करताय. आम्ही रामरक्षक आहोत. आमच्या रक्षणासाठी आम्ही ज्या रामाचा धावा करतो, आज त्याच्या रक्षणाची वेळ आमच्यावर आलीय. यालाच तर कलियुग म्हणतात.

एका रात्रीतला थरार जंतर मंतर, छू मंतर..

पदापेक्षा राष्ट्र सर्वोच्च'; अमित शाह यांची प्रतिक्रिया

प्रल्हाद जोशी नवे शिक्षण मंत्री…

ठाकरे बंधूंचा मोर्चा की व्यासपीठावर जल्लोष ?

मंदिर लुटीचा विषय तुम्हाला किती गंभीर वाटतो? या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले, अतिशय गंभीर आहे. शेवटी हे कोणत्या आधारावर सत्तेत आलेत. रामाच्या नावावरच त्यांचे राजकारण तरारले. आज आम्हाला अनाहूत सल्ले दिले जातायत. मंदिर लुटीचं राजकारण करू नका… तुम्ही कोण सांगणार आम्हाला राजकारण करू नका म्हणून. हिंदुत्वावर सल्ले देतात. कशासाठी? तुम्ही तुमचं काम करा ना. फालतू गोष्टीत नाक खुपसायला वेळ आहे तुम्हाला!

जेन झी रस्त्यावर का उतरली असा सवाल राऊत यांनी विचारला. त्यावर ठाकरे म्हणाले, २०१४ पासून भाबडेपणाने ज्यांना पाठिंबा दिला, त्यांनीच पाठीत वार केल्याची भावना जनतेच्या मनात आहे. प्रत्येक ठिकाणी हे सरकार नकारघंटाच वाजवत आहे. रोजगार मिळताहेत का?, महागाई कमी झाली का? पेट्रोलचे भाव उतरले का? गॅसचे दर उतरले का? अशा प्रश्नांची सरबत्ती करत पेट्रोलमध्ये इथेनॉलची भेसळ सुरू झाली. रस्त्यावर खड्डे पडत आहेत. पूल पडत आहेत. पक्ष फोडले जात आहेत. राम मंदिराची दान पेटी फोडली गेली आहे.

देशाच्या सरन्यायाधीशांनी तरुणाच्या केलेल्या हेटाळणीबद्दल उद्धव ठाकरे म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात अनेक क्रांतिकारक शहीद झाले. त्यांनी प्राण दिले. त्यांचं वय किती होतं? ते जेन झीचं होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सतराव्या वर्षी तोरणा किल्ला जिंकला, हे विसरताय का तुम्ही? ज्ञानेश्वरांनी वयाच्या सोळाव्या वर्षी 'ज्ञानेश्वरी' लिहिली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka