Dailyhunt
रोहित शेट्टी गोळीबार प्रकरणी बिष्णोई टोळीचा 'गोलू' आग्र्यातून जेरबंद

रोहित शेट्टी गोळीबार प्रकरणी बिष्णोई टोळीचा 'गोलू' आग्र्यातून जेरबंद

NEWS डंका 1 month ago

अटक आरोपींची संख्या १४ वर

प्रसिद्ध चित्रपट निर्माते रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील निवासस्थानावर झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत फरार आरोपी प्रदीप शर्मा उर्फ 'गोलू' (२३) याला आग्रा येथून अटक केली आहे.

उत्तर प्रदेश एसटीएफ आणि मुंबई क्राईम ब्रँचच्या संयुक्त मोहिमेत ही कारवाई पार पडली. या अटकेमुळे प्रकरणातील अटक आरोपींची संख्या आता १४ वर पोहोचली आहे.

मुंबई क्राईम ब्रँचकडून मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे यूपी एसटीएफच्या पथकाने सापळा रचत महावीर नगर परिसरातून प्रदीपला ताब्यात घेतले. गेल्या काही दिवसांपासून तो पोलिसांना चकवा देत लपून बसला होता. चौकशीत उघड झालेल्या माहितीनुसार, बिष्णोई टोळीचा हस्तक शुभम लोणकर याच्या सोशल मीडियावरील पोस्ट पाहून प्रदीप प्रभावित झाला होता. स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी त्याने टोळीशी संपर्क साधला. त्याचा साथीदार शिवम दुबे यांच्या सूचनेनुसार रोहित शेट्टी यांच्या 'शेट्टी टॉवर' या घरावर गोळीबार करण्याचा कट रचण्यात आला.

दलाल स्ट्रीटवर परदेशी गुंतवणूकदारांचा मोठा 'एग्झिट'

ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांची सिडनीतील मशिदीत उडविली हुर्यो

फ्लिपकार्टला मोठा धक्का! IPOपूर्वी ग्रुप CFO श्रीराम वेंकटरामन यांचा राजीनामा

मोहम्मद अजहरुद्दीन टीम इंडियात पदार्पण करणार?

१ फेब्रुवारीच्या रात्री झालेल्या या गोळीबारासाठी प्रदीपने विष्णू कुशवाहा आणि दीपक या दोघांना तयार केले होते. त्यांनीच प्रत्यक्षात अंधाधुंद गोळीबार केला. याआधीही २८ मे २०२५ रोजी राजस्थानातील श्रीगंगानगर येथे प्रदीपने अशाच प्रकारचा गुन्हा केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात यापूर्वी मुख्य शूटर दीपक, विष्णू कुशवाहा तसेच शुभम लोणकरचा भाऊ प्रवीण लोणकर यासह १३ जणांना अटक करण्यात आली होती. प्रवीण लोणकर हा बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात आर्थर रोड तुरुंगात असताना त्याने 'लॉजिस्टिक' मदत केल्याचेही उघड झाले आहे.

दरम्यान, प्रदीप शर्मा उर्फ गोलू हा या प्रकरणातील १४वा आरोपी असून त्याच्यावर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्याला रविवारी सुट्टीकालीन न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई क्राईम ब्रँचकडून देण्यात आली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka