Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सचिन वाझेच्या जामिनाला अंतरिम स्थगिती

सचिन वाझेच्या जामिनाला अंतरिम स्थगिती

NEWS डंका 3 weeks ago

मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

अँटिलिया स्फोटक प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याला विशेष न्यायालयाने मंजूर केलेल्या जामिनाला मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे.

त्यामुळे जामीन मंजूर होऊनही वाझेची तुरुंगातून सुटका होणार नाही. उच्च न्यायालयाने राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) आव्हान याचिकेवर ७ ऑक्टोबरला पुढील सुनावणी ठेवली आहे.

विशेष न्यायालयाने २९ सप्टेंबर रोजी सचिन वाझेला अँटिलिया स्फोटक प्रकरण तसेच मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात जामीन मंजूर केला होता. या निर्णयाला एनआयएने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. एनआयएच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी विशेष न्यायालयाने वाझेला जामीन देताना चूक केल्याचा युक्तिवाद केला. त्यानंतर न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने विशेष न्यायालयाच्या २९ सप्टेंबरच्या आदेशाला अंतरिम स्थगिती दिली.

या प्रकरणाच्या सुनावणीसाठी बुधवारी आधी न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती आशिष चव्हाण यांच्या खंडपीठासमोर याचिका आली होती. मात्र, या खंडपीठाने प्रकरणाच्या सुनावणीपासून स्वतःला बाजूला केले. त्यानंतर एनआयएने दुसऱ्या खंडपीठासमोर याचिका मांडली आणि तेथे वाझेच्या जामिनाला अंतरिम स्थगिती मिळाली. दरम्यान, वाझेची जामिनावर सुटका होण्यापूर्वीच्या औपचारिकता अद्याप पूर्ण झालेल्या नव्हत्या. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे तो सध्या तुरुंगातच राहणार आहे.

कांदिवलीच्या प्रियांका पारेखची पॉवरलिफ्टिंगमध्ये सुवर्ण कामगिरी

एअर इंडियाला १० हजार कोटींच्या कर्जाची गरज

इंडी आघाडीच्या बैठकीकडे आप, डीएमकेची पाठ

आरबीआयच्या हस्तक्षेपामुळे रुपयाची घसरण थांबली

२५ फेब्रुवारी २०२१ रोजी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील 'अँटिलिया' या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली एसयूव्ही आढळली होती. या वाहनाशी संबंधित असलेले व्यावसायिक मनसुख हिरेन यांचा ५ मार्च २०२१ रोजी ठाणे परिसरातील खाडीत मृतदेह आढळला होता. या प्रकरणाच्या तपासानंतर एनआयएने १३ मार्च २०२१ रोजी सचिन वाझेला अटक केली होती.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka