बंगळुरूमध्ये अन्न सुरक्षा विभागाची विशेष तपासणी मोहिम
कर्नाटकातील बंगळुरूमध्ये अन्न सुरक्षा विभागाने केलेल्या विशेष तपासणी मोहिमेत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील प्रसिद्ध स्कायये लाउंजच्या स्वयंपाकघरात अस्वच्छ परिस्थितीत अन्नपदार्थ ठेवण्यात आल्याचे आढळून आले.
तपासणीदरम्यान सडलेले चिकन आणि बीफ, तसेच मुदत संपलेले दूध आणि दही आढळल्याने अधिकाऱ्यांनी लाउंजचे स्वयंपाकघर बंद करण्याचे आदेश दिले.
अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासन विभागाने बंगळुरू अर्बन जिल्हा तसेच बीबीएमपीच्या विविध भागांमध्ये विशेष तपासणी मोहीम राबवली. या कारवाईदरम्यान विविध ठिकाणांहून सुमारे १३२ किलो अन्नपदार्थ जप्त करून नष्ट करण्यात आले. याशिवाय १५ लिटर वापरलेले स्वयंपाकाचे तेलही विल्हेवाट लावण्यात आले.
या ठिकाणाहून एकूण ५१ किलो अन्नपदार्थ मानवी सेवनासाठी अयोग्य आढळले. यामध्ये ४५ किलो सडलेले चिकन आणि बीफ, तर ६ किलो व्हेजिटेबल कटलेट्सचा समावेश होता. हे सर्व अन्नपदार्थ नियमानुसार नष्ट करण्यात आले. त्याचबरोबर १५ लिटर वापरलेले स्वयंपाकाचे तेलही विल्हेवाट लावण्यात आले.
या मोहिमेत बंगळुरूमधील इतर हॉटेल्स आणि खाद्य आस्थापनांवरही कारवाई करण्यात आली. रॉयल चेन हॉटेलमधून ५० किलो बदकाचे मांस आणि ५ किलो मासे, म्हणजेच एकूण ५५ किलो अन्नपदार्थ जप्त करण्यात आले. मद्रास किचनमधून ५ किलो हिरवे वाटाणे, तर टेस्कॉन हॉटेलमधून ५ किलो मशरूम जप्त करण्यात आले.
बंगळुरूमधील विविध हॉटेल्सना अन्नपदार्थ पुरवणाऱ्या कोल्डमन लॉजिस्टिक्स आणि राधाकृष्ण फूड या खाद्य साठवणूक व वितरण केंद्रांचीही तपासणी करण्यात आली. येथे सुमारे ७० किलो सोया सॉस तसेच मुदत संपण्याच्या जवळ असलेले विविध सॉस आढळून आले. हे पदार्थही जप्त करण्यात आले.
अजित पवारांच्या घटनेनंतर बारामतीत पुन्हा विमान अपघात
झारखंडमध्ये संघर्ष तीव्र; सीबीआय चौकशी हवीच!
महाकाल दर्शनाहून परतताना भीषण अपघात; ६ भाविकांचा मृत्यू
ममता बॅनर्जींच्या ताफ्यावर चिखल-बूटफेक?
ही विशेष मोहीम अन्नपदार्थांची साठवणूक, गुणवत्ता, स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या नियमांचे पालन होत आहे की नाही, हे तपासण्यासाठी राबवण्यात आली. या मोहिमेसाठी अन्न सुरक्षा विभागाने ३० पथके नियुक्त केली होती. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खाद्य व्यावसायिकांविरोधात अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.

