Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सलग दुसऱ्या दिवशी चांदीच्या दरात मोठी घसरण

सलग दुसऱ्या दिवशी चांदीच्या दरात मोठी घसरण

दोन दिवसांत किंमती १० हजार रुपयांनी कमी

आंतरराष्ट्रीय बाजारातून मिळालेल्या सकारात्मक संकेतांमुळे देशातील सराफा बाजारात पुन्हा एकदा सोन्याच्या दरांनी मोठी झेप घेतली आहे. राजधानी दिल्लीत २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा दर तब्बल १ लाख ६४ हजार ९०० रुपये प्रति १० ग्रॅम या ऐतिहासिक पातळीवर पोहोचला आहे.

गेल्या दोन दिवसांत सोन्याच्या किंमतींमध्ये एकूण २ हजार १०० रुपयांची वाढ झाली असून गुंतवणूकदारांमध्ये पुन्हा सोन्याकडे आकर्षण वाढताना दिसत आहे.

बुधवारी सोन्याच्या दरात १ हजार ३०० रुपयांची वाढ नोंदवण्यात आली. त्याआधी मंगळवारीही ८०० रुपयांची तेजी दिसली होती. तज्ज्ञांच्या मते, अमेरिका आणि इराण यांच्यात वाढलेला तणाव, जागतिक आर्थिक अनिश्चितता आणि सुरक्षित गुंतवणुकीचा वाढलेला कल यामुळे सोन्याच्या मागणीत वाढ झाली आहे. डॉलर मजबूत असतानाही गुंतवणूकदारांनी पुन्हा सोन्याकडे मोर्चा वळवल्याने किंमतींना आधार मिळाला.

इन्स्टाग्रामद्वारे दहशतवादी भरती करणाऱ्या हमराज शेखला सात वर्षांची शिक्षा

मोदींच्या 'मेलोडी' गिफ्टचा गोड परिणाम

फीफा वर्ल्ड कप २०२६ साठी ब्राझील संघात नेमारची पुनरागमन

मात्र दुसरीकडे चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण झाली आहे. चांदीचा दर ५ हजार रुपयांनी घसरून २ लाख ६६ हजार रुपये प्रति किलोवर आला आहे. विशेष म्हणजे अवघ्या दोन दिवसांत चांदी तब्बल १० हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे. मागील सत्रातही चांदीत ५ हजार रुपयांची घसरण झाली होती. औद्योगिक मागणीतील कमकुवतपणा आणि नफावसुलीमुळे चांदीच्या दरांवर दबाव वाढल्याचे बाजार विश्लेषकांचे मत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातही मौल्यवान धातूंमध्ये चढ-उतार सुरू आहेत. स्पॉट गोल्डचा दर प्रति औंस ४ हजार ४८३ डॉलरच्या आसपास व्यवहार करत होता, तर चांदीचा दर ७५ डॉलर प्रति औंसच्या पुढे गेला. अमेरिकन बाँड यिल्ड, डॉलर इंडेक्स आणि भू-राजकीय घडामोडी यांचा थेट परिणाम सोन्या-चांदीच्या बाजारावर होत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

विशेष म्हणजे अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह बँक व्याजदरांबाबत काय भूमिका घेते याकडे आता संपूर्ण बाजाराचे लक्ष लागले आहे. आगामी 'एफओएमसी' बैठकीचे मिनिट्स जाहीर झाल्यानंतर सोन्या-चांदीच्या दरात आणखी मोठी हालचाल होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याचबरोबर 'स्ट्रेट ऑफ होर्मुज' परिसरातील तणाव आणि जागतिक महागाईची भीती यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी वाढत असल्याचेही जाणकार सांगत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka