Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सलीम वास्तिक हल्ला प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार

सलीम वास्तिक हल्ला प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार

NEWS डंका 4 months ago

गाझियाबाद येथे इस्लामशी फारकत घेतलेल्या सलीम वास्तीक यांच्यावर झाला होता हल्ला

उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे इस्लामशी फारकत घेतलेल्या सलीम वास्तीक यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता.

एक्स-मुस्लिम यूट्यूबर अशीही ओळख असलेल्या सलीम वास्तिक यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यातील एका आरोपीला उत्तर प्रदेश पोलिसांनी चकमकीदरम्यान ठार केले आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी रविवारी (१ मार्च) चकमकीत मुख्य आरोपींपैकी एक जीशान याला ठार केल्याची माहिती दिली. पोलिसांच्या माहितीनुसार, चकमकीत जखमी झालेल्या आरोपीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी सांगितले की, लोनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सलीम वास्तिक यांच्यावर हल्ला करणाऱ्या १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर असलेल्या आरोपीला गाझियाबाद पोलिसांनी चकमकीत जखमी अवस्थेत ताब्यात घेतले होते. पोलिसांच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे, 'लोनी क्षेत्रात सलीम वास्तिक यांच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या १ लाख रुपयांचे बक्षीस घोषित आरोपीला गाझियाबाद पोलिसांनी चकमकीत जखमी अवस्थेत अटक केली होती. उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.' पोलिसांनी पुढे सांगितले की, आरोपीच्या ताब्यातून एक 'मेड इन इटली' पिस्तूल तसेच सलीम वास्तिक यांच्यावर हल्ला करण्यासाठी वापरलेला पेपर कटर जप्त करण्यात आला आहे.

दरम्यान, २६ फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे ८ वाजता गाझियाबादच्या लोनी भागातील अशोक विहार कॉलनी येथे सलीम वास्तिक यांच्या कार्यालयात दोन अज्ञात हल्लेखोरांनी घुसून धारदार शस्त्राने हल्ला केला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, हल्लेखोर मोटारसायकलवर आले होते आणि त्यांनी हेल्मेट घातले होते. हल्ल्यानंतर ते घटनास्थळावरून फरार झाले. स्थानिक नागरिकांनी आरडाओरड ऐकून पोलिसांना माहिती दिली.

गंभीर जखमी अवस्थेत वास्तिक यांना प्रथम स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र प्रकृती खालावल्याने त्यांना दिल्लीतील गुरु तेग बहादुर रुग्णालयात हलवण्यात आले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्णालयातील सूत्रांनुसार त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे.

नूर खान एअरबेससह पाकिस्तानमधील प्रमुख लष्करी तळांवर अफगाणिस्तानचा हल्ला

इराण रिव्होल्यूशनरी गार्डचे मुख्यालय अमेरिकेकडून उध्वस्त!

जेन झीचे डिजिटल जग, सस्टेनेबिलिटी आणि मानसिक आरोग्याला प्राधान्य

घरगुती कामांसाठी पारंपारिक 'बाई'वर अवलंबून राहण्याची पद्धत बदलली

पोलिसांच्या माहितीनुसार, ठार झालेल्या आरोपीची ओळख अमरोहा येथील जीशान अशी झाली असून, चकमकीत त्याला दोन गोळ्या लागल्या होत्या. या प्रकरणात सलीम वास्तिक यांच्या मुलगा उस्मान यांच्या तक्रारीवरून सात नामनिर्दिष्ट आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींच्या अटकेसाठी १० विशेष पथके गठित करण्यात आली असून दिल्ली आणि गाझियाबाद येथे चार ठिकाणी छापे टाकण्यात आले. या घटनेनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलिसांना 'कडक कारवाई' करण्याचे आणि हल्लेखोरांना लवकरात लवकर अटक करण्याचे निर्देश दिले होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka