Dailyhunt
'समलैंगिक व्यक्तीला राज्यसभेत पाठवणे इस्लामविरोधी; तृणमूलने प्रोत्साहन देऊ नये'

'समलैंगिक व्यक्तीला राज्यसभेत पाठवणे इस्लामविरोधी; तृणमूलने प्रोत्साहन देऊ नये'

NEWS डंका 2 months ago

मौलाना शहाबुद्दीन रिजवी बरेलवी यांचे वक्तव्य

स्लामिक रिसर्च सेंटरचे संस्थापक आणि इस्लामिक इतिहासाचे लेखक मौलाना शहाबुद्दीन रिझवी बरेलवी यांनी तृणमूल काँग्रेसकडून राज्यसभेसाठी समलैंगिक कार्यकर्त्या मेनका गुरूस्वामी यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला आहे.

समलैंगिक व्यक्तीला राज्यसभेत पाठवणे इस्लामच्या विरोधात असल्याचे सांगत त्यांनी तृणमूल कॉंग्रेसने अशा गोष्टींना प्रोत्साहन देऊ नये, असे आवाहन केले आहे.

मौलाना शहाबुद्दीन रिजवी म्हणाले, 'पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मेनका गुरुस्वामी यांना राज्यसभेचे तिकीट दिले असून त्या आता तृणमूलकडून राज्यसभेच्या खासदार होणार आहेत. त्या समलैंगिकतेला प्रोत्साहन देतात. समलैंगिकतेबाबत बोलताना मौलानांचा सूर नाराजीचा होता. त्यांनी म्हटले की, 'त्या समलैंगिक आहेत. त्यांच्या एका महिला मैत्रिणीबाबतही तसे सांगितले जाते.'

समलैंगिकतेकडे इस्लामच्या दृष्टिकोनातून पाहताना मौलाना शहाबुद्दीन म्हणाले, 'समलैंगिकता इस्लामच्या दृष्टीने अनुचित आहे आणि तिला प्रोत्साहन देणेही चुकीचे आहे.' इस्लाम आणि भारतीय संस्कृतीचा दाखला देत त्यांनी तृणमूलच्या निर्णयावर टीका केली. 'इस्लाम आणि भारताची तहजीब या दोन्हींचा या विषयावर समान दृष्टिकोन आहे. भारतीय संस्कृतीही समलैंगिकतेला चुकीचे मानते. समाजात याला प्रोत्साहन मिळाले आणि अशा व्यक्ती राज्यसभेत पोहोचल्या तर त्यांना कायदेशीर अधिकार मिळतील, त्यामुळे समाजरचना विस्कळीत होईल,' असे त्यांनी म्हटले.

पुण्यात गाड्या फोडत होता सुलतान शेख; पोलिस अधिकारी रवींद्र कदम यांनी काढली धिंड

वॉर्नर ब्रदर्स-पॅरामाउंटचा ऐतिहासिक करार

अंधेरीतील हॉटेलमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

GDP रीसेटनंतर भारताची झेप! FY26 मध्ये विकासदर ७.६ टक्क्यांवर

मेनका गुरुस्वामी या एक समलैंगिक हक्क कार्यकर्त्या आहेत. त्या तृणमूल काँग्रेसशी संबंधित असून सामाजिक न्याय आणि समानतेच्या मुद्द्यांवर ठाम भूमिका घेत आल्या आहेत. समाजातील भेदभाव आणि लैंगिक अल्पसंख्यांकांविरुद्ध असलेल्या पूर्वग्रहांविरोधात जनजागृती करण्याचे काम त्या करतात. सार्वजनिक व्यासपीठांवर त्या LGBTQ+ अधिकारांच्या समर्थनार्थ बोलत आल्या असून धोरणात्मक बदलांची मागणी करत असतात. दरम्यान, आगामी राज्यसभा निवडणुकांपूर्वी पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसने चार उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. त्यामध्ये राज्याचे कॅबिनेट मंत्री बाबुल सुप्रियो, पश्चिम बंगालचे माजी डीजीपी राजीव कुमार, वरिष्ठ वकील मेनका गुरुस्वामी आणि अभिनेत्री कोएल मलिक यांचा समावेश आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka