Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
समय रैनाच्या 'लेटेंट'मधील जोक्सवरून वाद

समय रैनाच्या 'लेटेंट'मधील जोक्सवरून वाद

NEWS डंका 3 weeks ago

बिहार-काश्मीरवरील वक्तव्यांनी राजकीय वातावरण तापले

मय रैना यांच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' या शोच्या नव्या भागातील बिहार आणि काश्मीरवरील विनोदी संवादामुळे पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले आहे.

शोमध्ये समय रैना आणि कॉमेडियन शेरॉन वर्मा यांच्यात रोस्टदरम्यान एकमेकांच्या प्रादेशिक पार्श्वभूमीवरून टोमणे मारण्यात आले. सुरुवातीला हा संवाद विनोदी स्वरूपात असला, तरी काश्मीर आणि बिहारी अस्मितेशी संबंधित टिप्पणी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या.

या प्रकरणात महाराष्ट्रातील भाजप आमदार राम कदम यांनी समय रैनावर जोरदार टीका केली. केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी जाणूनबुजून वादग्रस्त वक्तव्ये केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. काश्मिरी पंडितांच्या वेदना आणि त्यांच्या विस्थापनासारख्या संवेदनशील विषयांची खिल्ली उडवणे योग्य नसल्याचेही कदम यांनी म्हटले. त्यांच्या मते, एखाद्याने आक्षेपार्ह वक्तव्य करून नंतर माफी मागितली तरी त्यातून मिळणारी प्रसिद्धी आधीच मिळालेली असते.

कामगिरीवर लक्ष द्या, निवडकर्ते स्वतः शोधत येतील!

काँग्रेस पक्ष सांगतोय २५ वर्षे थांबा! संसदेतील धिंगाण्यामागील गांधींची धाकधुक चव्हाट्यावर…

अफगाणिस्तानवरील पकड ढिली पडल्यानंतर पाकिस्तानने घेतला दहशतवादाचा आधार

या वादावर शिवसेनेचे संजय निरुपम यांनी तुलनेने संयमाची भूमिका घेतली. कॉमेडीला कॉमेडी म्हणून पाहिले पाहिजे, मात्र बिहार आणि काश्मीरशी संबंधित दोन्ही टिप्पण्या खटकणाऱ्या असल्याचे त्यांनी सांगितले. विशेषतः काश्मिरी पंडितांनी भोगलेल्या अन्यायाची खिल्ली उडाल्याचे जाणवल्याचे त्यांनी नमूद केले. दुसरीकडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आनंद दुबे आणि बिहारचे शिक्षणमंत्री मिथिलेश तिवारी यांनीही या वक्तव्यांचा निषेध केला. तिवारी यांनी अशा प्रकारच्या अवमानकारक वक्तव्यांना असह्य असल्याचे म्हटले.

दरम्यान, जम्मू-काश्मीर पीस फोरमनेही समय रैना आणि शेरॉन वर्मा यांच्या संवादावर नाराजी व्यक्त केली. विनोद आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याला विरोध नसला, तरी त्यासोबत संवेदनशीलतेची आणि जबाबदारीची जाणीव असणे गरजेचे असल्याचे फोरमने स्पष्ट केले. बिहारला अपमानाचे प्रतीक आणि काश्मीरला केवळ विनोदाचा विषय बनवू नये, तसेच काश्मिरी पंडितांच्या विस्थापनासारख्या ऐतिहासिक वेदनादायी घटनांचे मनोरंजनात रूपांतर करू नये, अशी भूमिका फोरमने घेतली. त्यामुळे 'इंडियाज गॉट लेटेंट'मधील हा प्रसंग आता केवळ कॉमेडीपुरता मर्यादित न राहता विनोदाची सीमा, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सामाजिक संवेदनशीलता यावर नव्या चर्चेला कारणीभूत ठरला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka