Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सोन्या-चांदीला पुन्हा झळाळी; तणाव ओसरताच दर तेजीत

सोन्या-चांदीला पुन्हा झळाळी; तणाव ओसरताच दर तेजीत

NEWS डंका 0 months ago

देशांतर्गत बाजारासोबतच आंतरराष्ट्रीय बाजारातही मौल्यवान धातूंमध्ये तेजी

ध्य पूर्वेतील तणाव कमी झाल्याने जागतिक बाजारातील वातावरण सकारात्मक बनले असून त्याचा थेट परिणाम मौल्यवान धातूंवर दिसून आला आहे.

सोमवारी सकाळच्या व्यवहारात सोने आणि चांदीच्या दरांनी जोरदार उसळी घेतली, तर दोन्ही धातूंमध्ये जवळपास एक टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवली गेली.

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) वर ५ ऑगस्ट २०२६ च्या सोन्याच्या वायदा कराराची सुरुवात प्रति १० ग्रॅम १,४३,५७५ रुपये या दराने झाली. सकाळी ९.४५ वाजता सोने ९०७ रुपयांनी (०.६३ टक्के) वाढून प्रति १० ग्रॅम १,४४,०१३ रुपये या पातळीवर पोहोचले. दिवसाच्या सुरुवातीच्या व्यवहारात सोन्याने १,४४,१११ रुपये प्रति १० ग्रॅम हा उच्चांक गाठला.

चांदीच्या दरातही सकारात्मक हालचाल दिसून आली. ४ सप्टेंबर २०२६ च्या वायदा कराराची सुरुवात प्रति किलो २,२३,५०० रुपये या दराने झाली. सकाळी ९.४५ वाजता चांदी २,०६६ रुपयांनी (०.९३ टक्के) वाढून प्रति किलो २,२४,२०४ रुपये दराने व्यवहार करत होती. व्यवहारादरम्यान चांदीने २,२४,६३२ रुपये प्रति किलो हा उच्चांकी स्तर गाठला.

देशांतर्गत बाजारासोबतच आंतरराष्ट्रीय बाजारातही मौल्यवान धातूंमध्ये तेजी दिसून आली. सोने ०.४७ टक्क्यांच्या वाढीसह ४,०९० डॉलर प्रति औंस, तर चांदी ०.९५ टक्क्यांच्या वाढीसह ५९ डॉलर प्रति औंस या स्तरावर व्यवहार करत होती. बाजार विश्लेषकांच्या मते, डॉलर निर्देशांकात झालेली घसरण ही सोन्या-चांदीच्या दरवाढीमागील प्रमुख कारण आहे. अमेरिका आणि इराणमधील तणाव कमी झाल्यानंतर डॉलर निर्देशांक ०.२५ टक्क्यांनी घसरून १०१.०३ वर आला आहे. डॉलर कमकुवत झाल्यास गुंतवणूकदारांचा कल सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणूक पर्यायांकडे वाढतो, त्यामुळे किंमतींना आधार मिळतो.

त्या अभिनेत्रीने दाखवले मोदींचे अश्लील पोस्टर; गुन्हा दाखल

'कोक्रॉच' आंदोलनानंतर झाला ६० मेट्रिक टन कचरा

आयटीचा 'पॉवर प्ले'! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजारात तेजी

मालीत भारतीय हिरे व्यापाऱ्याचे अपहरण; ४४ कोटींची 'डील'

याचबरोबर मध्य पूर्वेतील परिस्थिती सुधारल्याने कच्च्या तेलाच्या किंमतींमध्येही मोठी घसरण झाली. ब्रेंट क्रूड ४.२३ टक्क्यांनी घसरून ८७.८० डॉलर प्रति बॅरल, तर डब्ल्यूटीआय क्रूड ४.८० टक्क्यांनी घसरून ८५.२० डॉलर प्रति बॅरल या दराने व्यवहार करत होते. तज्ज्ञांच्या मते, तेलाच्या किंमतीतील नरमाईमुळे जागतिक बाजारातील गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka