Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सोसायटीत महाप्रसाद करताय, मग आधी एफडीएला कळवा!

सोसायटीत महाप्रसाद करताय, मग आधी एफडीएला कळवा!

NEWS डंका 1 month ago

नियम मोडल्यास दंड

गणेशोत्सव, भंडारा, लंगर किंवा इफ्तारसारख्या सामूहिक अन्नवाटपाच्या कार्यक्रमांसाठी अन्न व औषध प्रशासनाने म्हणजेच एफडीएने नियम कडक केले आहेत. ३ सप्टेंबर २०२६ पासून आयुक्त तुकाराम मुंढे यांनी 'सण-उत्सव अंमलबजावणी दिनदर्शिका' लागू केली आहे.

या दिनदर्शिकेनुसार सामूहिक अन्नवाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यापूर्वी अन्न व औषध प्रशासनाला पूर्वसूचना देणे बंधनकारक आहे. या नियमांचा समावेश गृहनिर्माण सोसायट्यांमधील गणपती महाप्रसादाच्या आयोजनातही होतो. सोसायटीच्या आवारात केवळ रहिवाशांसाठी १०० ते २०० जणांचा प्रसाद आयोजित केला तरी तो सामूहिक अन्नवाटपाच्या कार्यक्रमात येतो.

महाप्रसाद किंवा सामूहिक अन्नवाटपाचा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या सोसायटीला संबंधित भागातील अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्याला किंवा नियुक्त अधिकाऱ्याला पूर्वसूचना द्यावी लागणार आहे. कार्यक्रमाच्या किमान ७ दिवस आधी विहित नमुन्यात पत्र सादर करावे लागणार आहे. या पत्रात कार्यक्रमाची तारीख, अपेक्षित उपस्थितांची संख्या, अन्न तयार करणाऱ्या व्यक्तीची किंवा केटररची माहिती आणि त्याचा अन्न सुरक्षा नोंदणी क्रमांक नमूद करावा लागणार आहे.

महाप्रसादासाठी बाहेरील केटररची सेवा घेतल्यास संबंधित केटररकडे अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाचा वैध नोंदणी क्रमांक किंवा परवाना असणे बंधनकारक आहे. अन्न तयार करण्याची जबाबदारी आचारी किंवा संस्थेकडे दिल्यास त्यांच्याकडेही आवश्यक अन्न सुरक्षा नोंदणी असणे आवश्यक असणार आहे. सोसायटीतील सदस्य स्वतः अन्न तयार करत असतील, तर लागू असलेल्या अन्न सुरक्षा नोंदणीच्या अटी पूर्ण कराव्या लागणार असून यासाठी अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाच्या फोसकॉस प्रणालीद्वारे नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

महाप्रसादासाठी लागणारे तेल, तूप, पनीर, किराणा आणि इतर खाद्यपदार्थ अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. खरेदीची बिले आणि पावत्या जतन करून ठेवणे आवश्यक असणार आहे. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करून विनापरवाना महाप्रसादाचे वाटप केल्यास गुन्हा दाखल होण्यासह १० हजार ते १ लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद असल्याचे सांगण्यात आले आहे.

एआय बनतोय हल्लेखोरांचे नवे हत्यार! सायबर हल्ले, हेरगिरी, शस्त्रविकासात गैरवापर

आयआरसीटीसी प्रकरणी लालू कुटुंबाविरोधात आरोप निश्चित करण्याचे आदेश

विजय मल्ल्याला बनायचंय 'कॉकरोच'!

फेटा, टिळा अन् हातात मोदक; मुख्यमंत्री फडणवीसांनी साकारला गणराय

सामूहिक अन्नवाटपाच्या कार्यक्रमात अन्न तयार करताना स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे लागते. अन्न हाताळणाऱ्या व्यक्तींनी स्वच्छ कपडे, एप्रन, टोपी आणि आवश्यक संरक्षणात्मक साधने वापरणे आवश्यक असणार आहे. स्वयंपाकासाठी आणि पिण्यासाठी स्वच्छ पाण्याचा वापर करावा लागणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka