Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
फेटा, टिळा अन् हातात मोदक; मुख्यमंत्री फडणवीसांनी साकारला गणराय

फेटा, टिळा अन् हातात मोदक; मुख्यमंत्री फडणवीसांनी साकारला गणराय

NEWS डंका 1 month ago

वाशीत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा

नवी मुंबईतील वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या भव्य गणेशमूर्ती कार्यशाळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः गणरायाची मूर्ती साकारली.

पर्यावरण आणि वातावरणातील बदल विभागाच्या वतीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. पर्यावरणाचा ऱ्हास टाळत प्रदूषणमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी शाडूच्या मातीपासून गणपतीची मूर्ती घडवली. त्यांनी साकारलेल्या मूर्तीच्या डोक्यावर फेटा, कपाळावर टिळा आणि हातात वीणा असल्याचे पाहायला मिळाले. त्यांच्या मूर्ती साकारतानाचा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. या कार्यशाळेला वनमंत्री गणेश नाईक, पंकजा मुंडे आणि मंदा म्हात्रे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. त्यांनीही शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती साकारल्या. विशेष म्हणजे, या उपक्रमात तब्बल ६ हजार ५०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनीही पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार केल्या.

चित्रपट पुरस्कार कार्यक्रम गुजरातला नेल्यामुळे राज ठाकरेंची चिडचिड

लडाखकडे पर्यटकांची ओढ! ८ महिन्यांतच चार लाखांचा टप्पा पार

आंध्र प्रदेशातील गणेश मंडपांना मोफत वीज

१३ वर्षांपासून फरार आरोपी हरनेक सिंहचे अमेरिकेतून प्रत्यार्पण

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक मूर्तींचा वापर वाढावा आणि गणेशोत्सवात प्रदूषण कमी व्हावे, यासाठी जनजागृती करण्याचा या कार्यशाळेचा उद्देश होता. मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः मूर्ती साकारून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश दिला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka