Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
ताज आणि ट्रायडंट हॉटेलला दहशतवादी हल्ल्याची धमकी देणारा ताब्यात

ताज आणि ट्रायडंट हॉटेलला दहशतवादी हल्ल्याची धमकी देणारा ताब्यात

NEWS डंका 2 weeks ago

मद्यधुंद अवस्थेत केला होता फोन

हरातील अतिसंवेदनशील आणि आयकॉनिक समजल्या जाणाऱ्या 'ताज महाल पॅलेस' आणि 'ट्रायडंट' हॉटेलवर दहशतवादी हल्ला होण्याची धमकी मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास देण्यात आली.

या धमकीच्या कॉलमुळे मुंबई पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने दोन्ही हॉटेल परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढवली.

या प्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा (NC) नोंदवण्यात आला असून, पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीचा माग काढत त्याला मुंबईतील सायन परिसरातून ताब्यात घेतले आहे. संशयित आरोपीची ओळख संतोष सावंत (रा. विचुंबे गाव, पनवेल, नवी मुंबई) अशी पटली आहे. आरोपी संतोष सावंत हा हाऊसकीपिंगचे काम करतो.

माझ्या मुलाच्या हत्येत तृणमूलचा हात…

सुवेंदू अधिकारी यांच्या पीएच्या हत्येत बनावट नंबर प्लेटच्या गाडीचा वापर

गोव्यात बागा-कलंगुट किनाऱ्यावर १७ अतिक्रमणे जमीनदोस्त

'भारताची प्रतिक्रिया दहशतवाद विरोधात ठाम आणि अचूक!'

प्राथमिक तपासात आरोपीने मद्याच्या नशेत हा फोन केल्याचे समोर आले आहे. तसेच तो कौटुंबिक समस्यांमुळे त्रस्त होता व नैराश्यातून त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक सखोल तपास सुरू असून, पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka