Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
तमिळनाडू सरकार नवजात बाळांना देणार अनोखी भेट

तमिळनाडू सरकार नवजात बाळांना देणार अनोखी भेट

१ लाख २८ हजार आंगठ्यांची दिली ऑर्डर

मिळनाडूमध्ये नवजात बाळांच्या स्वागतासाठी सरकारने अनोखी योजना जाहीर केली आहे. राज्यातील सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या प्रत्येक पात्र नवजात बाळाच्या बोटात सरकारकडून एक ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी घातली जाणार आहे.

'मामाची सोन्याची अंगठी' या योजनेची अंमलबजावणी १५ सप्टेंबर २०२६ पासून सुरू होणार असून, त्यासाठी तब्बल १ लाख २८ हजार ४९९ सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर देण्यात आली आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यासाठी सुमारे २२० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

मुख्यमंत्री थलपती विजय यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या बाळांना सोन्याची अंगठी देण्याचे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता करण्याच्या दिशेने सरकारने हे पाऊल उचलले आहे. विशेष म्हणजे, या योजनेचा लाभ २२ जून २०२६पासून सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या बाळांना दिला जाणार आहे. सी. एन. अण्णादुराई यांच्या जयंतीनिमित्त १५ सप्टेंबरपासून अंगठ्यांचे वाटप सुरू होणार आहे.

राहुल गांधींकडून द्वेष, पण काँग्रेस मुख्यमंत्री शिवकुमार यांना अदानी हवेहवेसे

महामेट्रोने म्हटले काँग्रेसचे आरोप महाखोटे !

साखर महागण्यामागे नेमकं काय? इथेनॉल की उत्पादनातील घट?

पहिल्या टप्प्यातील सर्व अंगठ्या २२ कॅरेट सोन्याच्या असून, प्रत्येक अंगठीचे वजन एक ग्रॅम असेल. एकूण १ लाख २८ हजार ४९९ अंगठ्यांसाठी सुमारे १२८.५ किलो सोन्याची गरज भासणार आहे. सध्याच्या बाजारभावानुसार एका अंगठीसाठी सरकारला अंदाजे १४ हजार ८५० रुपये खर्च येणार आहे. दोन दागिने विक्रेता कंपन्यांना या अंगठ्या तयार करण्याचे काम देण्यात आले आहे.

या योजनेमागचा मुख्य उद्देश सरकारी रुग्णालयांमध्ये प्रसूतीला प्रोत्साहन देणे हा असल्याचे सांगण्यात आले आहे. नवजात बाळाच्या जन्माचा आनंद साजरा करण्यासोबतच सरकारी आरोग्य व्यवस्थेवरील नागरिकांचा विश्वास वाढवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. त्यामुळे एका बाजूला नवजात बाळाला आयुष्याच्या सुरुवातीलाच सोन्याची खास भेट मिळणार आहे, तर दुसऱ्या बाजूला सरकारी रुग्णालयांमध्ये प्रसूतीचे प्रमाण वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka