Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
टायगर श्रॉफ गोळीबारप्रकरणी तीन अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा

टायगर श्रॉफ गोळीबारप्रकरणी तीन अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा

मुंबई पोलिसांकडून तपास सुरू

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर मुंबईतील जुहू परिसरात झालेल्या गोळीबारप्रकरणी मुंबई पोलिसांनी तीन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९(१) आणि ३(५), तसेच शस्त्रास्त्र कायद्यातील कलम ३ आणि २५ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

आरोपींची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

रविवारी, १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजता टायगर श्रॉफ एका फुटबॉल क्लबमधून कारने बाहेर पडत असताना ही घटना घडली. त्यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्या वाहनावर गोळीबार केला. या घटनेत टायगरचा चालक आणि अन्य एक व्यक्ती असे दोघे जखमी झाले. चालकाला गोळ्या लागल्याचे वृत्त आहे. मात्र, टायगर श्रॉफला गोळी लागलेली नाही.

मुंबई पोलिसांचे परिमंडळीय उपायुक्त मोहित गर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबारानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. घटनास्थळावरील परिस्थिती, उपलब्ध पुरावे आणि हल्लेखोरांची ओळख यांचा तपास केला जात आहे. आरोपींची ओळख आणि हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

बांगलादेशचे माजी हवाई दलप्रमुख कतारमध्ये अटकेत

इतना सन्नाटा क्यू है? ही आहेत चार कारणं |

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील आरोपी शूटरचा फोटो समोर

पंजाबच्या संगरूरमध्ये मनरेगाच्या २३ मजुरांना कारने चिरडले

दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी रात्री टायगर श्रॉफच्या निवासस्थानी जाऊन त्याची भेट घेतली. यावेळी त्यांनी टायगरच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि कुटुंबाला राज्य सरकारकडून आवश्यक सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. गोळीबारात टायगरच्या हाताला दारूगोळ्याची पूड आणि काचेचे तुकडे लागल्याने दुखापत झाल्याचे शिंदे यांनी सांगितले. टायगरची आई आयेशा श्रॉफही यावेळी उपस्थित होती. शिंदे यांनी या घटनेचा निषेध करत, सार्वजनिक व्यक्तींना धमकावण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा दिला. या प्रकरणातील आरोपींना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka