Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी भाजपा उमेदवाराच्या घरावर टाकला बॉम्ब

तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी भाजपा उमेदवाराच्या घरावर टाकला बॉम्ब

NEWS डंका 3 weeks ago

सीआयएसएफचा जवान जखमी, तृणमूलचे चार अटकेत

श्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षाशी संबंधित हिंसाचाराची आणखी एक गंभीर घटना समोर आली आहे. उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील भाटपारा परिसरात भाजप उमेदवार पवन सिंह यांच्या निवासस्थानाजवळ देशी बॉम्ब फेकण्यात आले आणि गोळीबार करण्यात आला.

या घटनेत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF)चा एक जवान जखमी झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणात ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस (टीएमसी)शी संबंधित चार जणांना अटक केली आहे.

माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींची ओळख कौशिक दास, सिकंदर प्रसाद, गोपाल राऊत आणि श्यामदेव शॉ अशी आहे. या अटक कारवाया बैरकपूर डीसीपी यांच्या समन्वयाने करण्यात आलेल्या छापेमारीदरम्यान करण्यात आल्या. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणात एकूण १५ आरोपींची ओळख पटली असून, त्यापैकी अनेक जण अजूनही फरार आहेत. फरार आरोपींमध्ये फिरोज, मुंजल राजक आणि इतरांचा समावेश असून त्यांचा शोध सुरू आहे.

या हिंसाचाराची सुरुवात जगदल परिसरात झाली, जेव्हा एक उमेदवार तक्रार नोंदवण्यासाठी जगदल पोलीस ठाण्यात गेला होता. पोलिसांचे म्हणणे आहे की, त्या वेळी सुमारे २०० जणांची गर्दी जमली आणि गोंधळ सुरू झाला. नंतर पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आणि दोन्ही बाजू तेथून निघून गेल्या.

यानंतर भाटपाऱ्यात पवन सिंह यांच्या घराजवळ हिंसाचार भडकला. जमावाने कथितपणे देशी बॉम्ब फेकले आणि गोळीबार केला. यावेळी त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात CISF जवान योगेश शर्मा यांना गोळी लागून ते जखमी झाले. त्यांच्या पायाला गोळी लागली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची गंभीरता लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने या प्रकरणाचा सविस्तर अहवाल मागवला आहे. प्रशासनाला घटनेच्या सर्व पैलूंची चौकशी करून तातडीने माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या घटनेनंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपही तीव्र झाले आहेत. टीएमसीच्या एका स्थानिक कार्यकर्त्याने उलट आरोप करत सांगितले की, त्यांच्या कार्यकर्त्यांवर आधी हल्ला झाला, जेव्हा ते तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले होते. तर भाजपने दावा केला आहे की, त्यांच्या उमेदवार आणि समर्थकांना लक्ष्य करत टीएमसी कार्यकर्त्यांनी हल्ला केला, ज्यात CISF जवान जखमी झाला.

सहा वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या मौलानाचे मुंडण, तोंड काळे

दाऊदचा निकटवर्ती डोला भारतात आला!

अमेरिकेच्या नाकेबंदीनंतरही जहाजं पार करतायत होर्मुझ! कसे ते जाणून घ्या

तुर्कीयेत भारताची धुरंधर कारवाई; बडे साहाबला धक्का

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान २९ एप्रिल रोजी होणार आहे. या घटनेमुळे निवडणूक सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे. प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कडक पावले उचलली जात असल्याचे आश्वासन दिले असून, दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे सांगितले आहे. सध्या पोलिसांकडून तपास सुरू असून 9+फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे, तसेच परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka