Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
व्हेनेझुएलात भारताच्या 'ऑपरेशन अमिस्ताद'चे कौतुक

व्हेनेझुएलात भारताच्या 'ऑपरेशन अमिस्ताद'चे कौतुक

भारताची मदत सामग्री आणि वैद्यकीय पथक व्हेनेझुएलात दाखल

व्हेनेझुएलामध्ये भूकंपानंतर भारताने सुरू केलेल्या 'ऑपरेशन अमिस्ताद' अंतर्गत दिल्या जात असलेल्या वैद्यकीय आणि मानवतावादी मदतीचे स्थानिक नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.

भारतीय लष्कराच्या फील्ड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या अनेक भूकंपग्रस्तांनी भारतीय डॉक्टरांची सेवा, तत्परता आणि व्यवस्थेचे मनापासून कौतुक केले आहे.

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी 'एक्स'वर भारतीय वैद्यकीय पथकाच्या कार्याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. या पोस्टला 'Healing Lives, Serving Humanity' अशी कॅप्शन देत भारतीय डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सेवाभावाला सलाम करण्यात आला आहे. एका व्हिडिओमध्ये जखमी नातेवाईकाला घेऊन आलेल्या महिलेने भारतीय वैद्यकीय पथकाबद्दल समाधान व्यक्त केले. ती म्हणाली, 'आम्ही ला ग्वायरा येथून येथे आलो. रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. तपासणीनंतर दोन्ही पायांच्या फिब्युला हाडांना फ्रॅक्चर असल्याचे सांगण्यात आले. आता येथेच शस्त्रक्रिया होणार आहे. येथील आरोग्य सुविधा आणि डॉक्टरांची सेवा खरोखरच उत्कृष्ट आहे.'

२४ जून रोजी व्हेनेझुएलामध्ये ७.२ आणि ७.५ रिश्टर तीव्रतेचे दोन शक्तिशाली भूकंप झाले होते. या दुहेरी भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली. व्हेनेझुएलाच्या आरोग्य विभागानुसार, आतापर्यंत या आपत्तीत २,२९५ जणांचा मृत्यू झाला आहे. या संकटानंतर भारताने तातडीने 'ऑपरेशन अमिस्ताद' सुरू करून व्हेनेझुएलाला मदत पाठवली. भारतीय लष्कराचे फील्ड हॉस्पिटल, औषधे, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे आणि इतर आवश्यक मदत सामग्री रविवारी तेथे पोहोचली असून बचाव आणि उपचार कार्यात त्याचा मोठा उपयोग होत आहे.

होर्मुझमधील गोळीबारानंतर कच्चे तेल घेऊन जहाज भारतात दाखल

'हर हर महादेव', 'बम बम भोले'च्या जयघोषात अमरनाथ यात्रेला प्रारंभ

दहशतवादी हल्ल्याच्या तयारीत असलेले चार जण जेरबंद

'मेक इन इंडिया'ला जपानचा पाठिंबा! अर्थकारण, संरक्षण, सेमिकंडक्टर भागीदारीला चालना

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे भारताची मदत व्हेनेझुएलात पोहोचल्याची माहिती दिली. भारतीय वैद्यकीय पथक आणि मदत सामग्रीमुळे भूकंपग्रस्तांच्या उपचारांना आणि मदतकार्यात मोठी मदत मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोट द'आयव्हरमधील भारतीय दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय हवाई दलाच्या दोन C-17 ग्लोबमास्टर विमानांद्वारे अबिदजानमार्गे मदत सामग्री आणि वैद्यकीय पथक व्हेनेझुएलात पोहोचवण्यात आले. या पथकात ४१ सदस्य असून त्यात ९ डॉक्टरांचा समावेश आहे. आपत्कालीन उपचार, गंभीर जखमींवर शस्त्रक्रिया, अतिदक्षता सेवा आणि इतर आवश्यक वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी हे पथक कार्यरत असल्याचे दूतावासाने स्पष्ट केले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka