Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
आईनं 29व्या मजल्यावरून मुलीला फेकलं अन् आयुष्याचा केला शेवट.

आईनं 29व्या मजल्यावरून मुलीला फेकलं अन् आयुष्याचा केला शेवट.

मुंबई: नवी मुंबईच्या पनवेल पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेने आपल्या मुलीला 29व्या मजल्यावरून खाली फेकले आणि महिलेनं स्वत: देखील इमारतीवरून उडी मारून आयुष्याचा शेवट केला आहे.

मायलेकीचा मृत्यू झाल्याने सोसायटीत खळबळ उडाली आहे.

या घटनेची नोंद पनवेल शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. ही घटना पनवेल येथील पळस्पे परिसरातील मॅरेथॉन नेक्सन ओरा बिल्डिंगमध्ये घडली आहे. या इमारतीत आशिष दुवा (वय ४१) हे पत्नी मैथिली दुवा आणि आठ वर्षीय मुलगी मायरा यांच्यासमवेत वास्तव्याला आहेत. ते इमारतीच्या २९ व्या मजल्यावर राहतात. घटनेच्या दिवशी मैथिली यांनी मानसिक अवस्था ठीक नसल्याने आपल्या आठ वर्षांच्या मुलीला बेडरूमच्या खिडकीतून खाली फेकले. मुलीला 29व्या मजल्यावरून खाली फेकून तिचा खून केल्यानंतर मैथिली यांनी देखील 29व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.

मायलेकीचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून, याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक प्रियंका शिंदे पुढील तपास करीत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka