Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
आळंदीमध्ये वारकरी संस्थेत शिक्षण घेणाऱ्या मुलावर महाराजाकडून बलात्कार.

आळंदीमध्ये वारकरी संस्थेत शिक्षण घेणाऱ्या मुलावर महाराजाकडून बलात्कार.

ळंदी (पुणे): आळंदीत वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या एका बारा वर्षीय मुलावर महाराजाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. आळंदी पोलिसांनी वारकरी संस्थेतील महाराजाला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

माडनूर मधील आळंदीत एक अन्नदान संस्था आहे. या संस्थेमध्ये बारा वर्षाचा अल्पवयीन मुलगा वारकरी शिक्षण घेत आहे. शनिवारी (ता. १७) पहाटे झोपलेल्या अवस्थेत असताना मुलाला महाराजाने त्याला उचलून टीव्ही असणाऱ्या खोलीत नेले. तसेच त्याला मोबाईल खेळायला देत त्याच्यावर अनैसर्गिक रित्या बलात्कार केला. याला मुलाने विरोध केला तरी देखील महाराजानी ऐकले नाही. आणि त्याला गप्प करत शांतपणे सर्व सहन करावे लागले, असे फिर्यादीत नमूद केले आहे.

आळंदी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर व्यकंटेश काशिनाथ माडनूर या महाराजाला अटक केली आहे. महाराजावर बालकांचे लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम कलम ४, ६ प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास आळंदी पोलिस करत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka