Dailyhunt
आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर फेक, चौकशी समितीचा पोलिसांवर ठपका.

आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर फेक, चौकशी समितीचा पोलिसांवर ठपका.

मुंबईः बदलापूर येथील शाळेतील दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदे याच्या पोलिस एन्काऊंटरबाबत एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. अक्षय शिंदे याचा मृत्यू बनावट चकमकीत झाल्याचा अहवाल सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आला.

न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी या अहवालाचे न्यायालयात वाचन केले. यामध्ये अनेक धक्कादायक गोष्टींचा उल्लेख आहे.

अक्षय शिंदे याला बदलापूरच्या दिशेने नेत असताना त्याने मुंब्रा बायपासनजीक गाडीतच पोलिसांची रिव्हॉल्व्हर हिसकावून घेतली. यामधून त्याने पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांन स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला, असा दावा पोलिसांकडून करण्यात आला होता. मात्र, चौकशी अहवालात अक्षय शिंदे याला बनावट चकमकीत मारण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. या बनावट चकमकीतील पाच पोलिस कर्मचाऱ्यांनी आपल्या बळाचा गैरपद्धतीने वापर केला. त्यामुळे हे पाच पोलिस कर्मचारी अक्षय शिंदे याच्या मृत्यूसाठी जबाबदार आहेत, असे संबंधित अहवालात नमूद करण्यात आले आहे.

अहवालात म्हटल्याप्रमाणे, ‘अक्षय शिंदे याच्या हाताचे ठसे रिव्हॉल्व्हरवर आढळून आलेले नाही. पोलिसांचा आत्मसंरक्षणासाठी आम्ही अक्षयवर गोळीबार केला हा दावा संशयास्पद असल्याचे अहवालात म्हटले आहे. अक्षय शिंदे याचा चकमकीत मृत्यू झाल्यानंतर घटनास्थळावरुन जमा केलेली सामुग्री आणि एफएसएल रिपोर्टनुसार, अक्षय शिंदे याच्या आई-वडिलांनी केलेले आरोप योग्य आहेत. अक्षय शिंदे याच्या मृत्यूसाठी पाच पोलिस कर्मचारी जबाबदार आहेत.’

दरम्यान, बदलापूरमधील शाळेतील दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा 23 सप्टेंबर रोजी एन्काऊंटर करण्यात आला होता. तळोजा कारागृहातून रिमांडसाठी नेत असताना घटना घडली होती. मुंब्रा बायपास जवळून जात असताना आरोपी अक्षय शिंदे याने एपीआय निलेश मोरे यांची सर्व्हिस रिव्हॉल्व्हर खेचली. यानंतर निलेश मोरे यांच्यावर त्याने 3 गोळ्या फायर केल्या. यातील एक गोळी निलेश मोरे यांच्या पायाला लागली आणि 2 गोळ्यांचा फायर चुकली. सोबत असलेले दुसरे अधिकारी, पोलिस निरीक्षक यांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला होता. रिव्हॉल्व्हरमधून झाडलेल्या 2 गोळ्या अक्षय शिंदेवर फायर केल्या. यातील एक अक्षय शिंदेच्या डोक्याला, तर दुसरी शरिरावर लागली होती.

The post आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर फेक, चौकशी समितीचा पोलिसांवर ठपका… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka