मुंबई : अभिनेता अजय देवगण सिंघम 3 च्या सेटवर एक अॅक्शन सीन शूट करताना जखमी झाला आहे. अजय देवगण याच्या डोळ्याला दुखापत झाली असल्यामुळे डॉक्टरांनी त्याला आराम करण्याचा सल्ला दिल्यामुळे सिंघम 3 चे शूट रद्द करण्यात आले आहे.
रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटात अजय देवगण सगळे अॅक्शन सीन स्वतः करतो. त्याला त्यासाठी बॉडी डबल वापरणे देखील आवडत नाही. रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम 3 साठीही त्याने असेच काही केले आहे. काही दिवसांपूर्वी सिंघम 3 च्या सेटवर एक अॅक्शन सीन शूट करताना अजय देवगण याच्या डोळ्याला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे सिंघम 3 चे शूट रद्द करण्यात आले आहे.
सिंघम 3 हा एक बहुप्रतिक्षित चित्रपट आहे, ज्याच्या फ्रेंचायझीचे पहिले दोन भाग बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले आहेत. या अॅक्शन फ्रँचायझीची सुरुवात 2011 मध्ये रिलीज झालेल्या 'सिंघम' चित्रपटापासून झाली आणि त्यानंतर 2014 मध्ये रिलीज झालेल्या 'सिंघम रिटर्न्स' चित्रपटाने सुरुवात केली. या पोलिस ड्रामामध्ये अजय देवगण बाजीराव सिंघमच्या मुख्य भूमिकेत आहे, जो अन्यायाविरुद्ध लढतो आणि पीडितांना न्याय देतो. त्यामुळे आता सिंघम 3 मध्ये काय धमाका होणार याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.
The post अभिनेता अजय देवगण अपघातात जखमी… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

