मुंबईः अभिनेता सैफ अली खान याच्यावर घरामध्ये मध्यरात्री जीवघेणा हल्ला झाल्यानंतर त्याला रिक्षातून लीलावती रुग्णालयात नेण्यात आले. कोट्यधीश असलेल्या सैफला सर्वसामान्य रिक्षावाल्याने रुग्णालयात नेले.
रिक्षाचालकाने सैफ अली खानचा जीव वाचवला होता. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्यापूर्वी सैफ अली खाने रिक्षाचालकाची भेट घेतली. त्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सैफ अली खान याला लीलावती हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेल्या रिक्षाचालकाने संपूर्ण घटना सांगितला. मध्यरात्री 2.30 वाजता नेमकं काय घडलं हे सांगितले. ऑटो-रिक्षा चालक भजन सिंग म्हणाला, ‘त्याच्या पाठीला दुखापत झाली होती. मला खूप वाईट वाटले कारण त्याला रक्तस्त्राव होत होता. सैफ अली खान माझ्या रिक्षात बसला आहे याची मला कल्पना नव्हती. मला वाटलं की कोणीतरी जखमी व्यक्ती तिथे बसली असावी. लीलावती हॉस्पिटलमध्ये गेल्यावर सैफ आणि त्याचा मुलगा रिक्षातून खाली उतरले तेव्हा मला जाणवलं की स्टार अभिनेता रिक्षात बसला आहे.’
सैफ अली खान याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. त्याआधी सैफ अली खान याने रुग्णालयातच जीव वाचवणाऱ्या रिक्षाचालकाची भेट घेतली. रिक्षाचालकाच्या गळ्यात हात टाकून सैफने फोटो काढले. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
दरम्यान, सैफ अली खान याला रक्तबंबाळ अवस्थेत पाहून पत्नी करीना कपूर घाबरली होती. तिने जवळ राहणारा सावत्र मुलगा इब्राहिम अली खान याला फोन केला. तो सैफच्या घराखाली रिक्षा घेऊन आला आणि त्याने रिक्षात बसवून वडील सैफला लीलावती रुग्णालयात नेले. रिक्षाचालकाने अगदी काही वेळात सैफला लिलावती रुग्णालयात पोहोचले. यामुळे सैफला वेळेत उपचार मिळाले आणि त्याचा जीव वाचला. त्यावेळी रिक्षाचालकाने सैफकडून एकही पैसा घेतला नव्हता.
The post अभिनेता सैफ अली खानने जीव वाचवणाऱ्या रिक्षावाल्याची घेतली भेट… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

