Dailyhunt
अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या घरावर, कार्यालयावर ईडीचे छापे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या घरावर, कार्यालयावर ईडीचे छापे.

मुंबईः बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या सांताक्रुझ येतील घरावर ईडीने छापा टाकला आहे. पोर्नोग्राफी केससंर्भात मुंबई आणि उत्तर प्रदेशात 15 ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे.

यामध्ये शिल्पा शेट्टी हिच्याही घरी ईडीने ही कारवाई केली आहे.

सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने (ED) शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्र यांच्याशी निगडीत असलेल्या काही खटल्यांप्रकरणी ही कारवाई केली आहे. अडल्ट कन्टेंट निर्मिती आणि अशा प्रकारच्या कन्टेंन्टचे मोबाईलच्या अॅपच्या माध्यमातून वितरण केल्याचा राज कुंद्रा याच्यावर आरोप आहे. याच खटल्यासंदर्भात त्यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचाही आरोप आहे. याच आरोपांखाली राज कुंद्रा काही दिवस कारागृहात होता, सध्या जामिनावर बाहेर आहेत.

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा यांच्या घरावर ईडीने छापे टाकले आहेत. तपास यंत्रणेकडून 15 ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू आहे. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेशातील अनेक शहरांमध्ये सर्च ऑपरेशन सुरू आहे. घर, कार्यालय आणि इतर ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. राजची पत्नी शिल्पा आणि तिच्या जवळच्या नातेवाईकांच्या घरांवरही छापेमारी झाल्याची माहिती पुढे आली आहे.

मोबाईल ऍप्लिकेशन्सद्वारे अश्लील मजकूर तयार करणे आणि त्याची विक्री करणे यासंबंधी मनी लॉन्ड्रिंगच्या तपासासंदर्भात ईडीने या जोडप्याच्या घरावर छापा टाकला आहे. ED चा तपास 2021 च्या मुंबई पोलिसांच्या केसवर आधारित आहे. राज कुंद्राला यापूर्वी जुलै २०२१ मध्ये मुंबई गुन्हे शाखेने अटक केली होती. नंतर न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. या प्रकरणात राज कुंद्राने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले होते.

राज कुंद्रा आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीला ईडीचा दणका; कोट्यावधींची संपत्ती जप्त…

आम्ही वेगळे झालोय! अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्र याचे ट्विट…

आमदार अनिल भोसले यांच्या पत्नीला तोतया ईडी अधिकाऱ्याचा फोन; म्हणाला…

पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

The post अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या घरावर, कार्यालयावर ईडीचे छापे… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka